Take a fresh look at your lifestyle.

निवडणूक बातमी : बंगालमध्ये मतदारांचा उत्साह जोरात; ४ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान..!

कोलकाता :

Advertisement

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यावेळी मतदारांचा जबरदस्त उत्साह दिसून येत आहे. शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील ३० जागांसाठी तब्बल  ७०.१७ टक्के इतके मतदान झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

Advertisement

पश्चिम बंगाल विधानसभेसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. २ मे रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत. आज शनिवार पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यावेळी मतदारांचा उत्साह दिसत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. यामध्ये पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात ७२.३८ टक्के, पश्चिम मेदिनीपूरमध्ये ६८.७६ टक्के, झारग्राममध्ये ७२.१० टक्के, पुरुलियामध्ये ६९.२४ टक्के, तर बांकुडामध्ये ६८.०३ टक्के मतदान झाले आहे.  मतदानाच्या शेवटच्या वेळेत मतदानाची टक्केवारी आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे.

Advertisement

देशात तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, पाँडेचेरी आणि आसाम या पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा पश्चिम बंगालची आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपने येथे सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. येथे तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत आहे. डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढत आहेत. बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला भाजपने जबरदस्त आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजपने कडवी टक्कर देत राज्यातील ४२ पैकी १८ जागा मिळवल्या होत्या. दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या नंदीग्राममध्ये दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply