Take a fresh look at your lifestyle.

ममतादीदीने मागितली भाजपला मदत; पहा नेमके काय आहे ‘त्या’ क्लिपमध्ये

कोलकाता :

Advertisement

पश्चिम बंगाल हे राज्य ताब्यात घेऊन अवघा देश भगवा करण्यासाठी भाजप सरसावलेला आहे. त्यासाठी भाजपने या राज्यामध्ये विशेष लक्ष दिलेले आहे. येथील मतदारांनीही जोरदारपणे मतदान करून कोण जिंकणार याची उत्सुकता वाढवली आहे. त्यातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची एक अॉडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाबरोबरच राजकीय टीकाटिपण्णीलाही वेग आलेला आहे. भाजप  नेते प्रलय पाल यांनी तर मोठा धक्का दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढविणा ममता बॅनर्जी यांना आपल्या विजयाचा विश्वास नाही, म्हणून त्यांनी मला बोलावले आणि मला मदत मागितली.

Advertisement

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक असलेल्या प्रलय पाल यांनी याचे कॉल रेकॉर्डिंगही प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी, भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनीही व्हिडिओ प्रसिद्ध करून ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढविला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दीदी नंदीग्राममधून निवडणूक हरणार आहेत.

Advertisement

पाल यांनी शनिवारी सकाळी दावा केला की, ममता बॅनर्जी यांनी त्यांना बोलावून नंदीग्राम जागा जिंकण्यासाठी मदत मागितली आहे. ममता दीदींनी मला टीएमसीसाठी काम करण्यासाठी टीएमसीकडे परत येण्यासाठी म्हटले आहे. पण सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांशी माझे जवळचे नाते आहे. आता मी भारतीय जनता पक्षासाठी काम करत आहे. त्यामुळे मी माझ्या पक्षाला फसवू शकत नाही.

Advertisement

सोशल मीडियावर या दोघांमधील संभाषणाचा कथित ऑडिओही व्हायरल होत आहे. टीएमसीने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे की, कॉल रेकॉर्डिंगच्या आवाजाच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही. म्हणूनच, याबद्दल आत्ताच प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही.

Advertisement

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या वेळीच भाजपने ही क्लिप पुढे आणून तृणमूल काँग्रेस या पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता मतदार याप्रकरणी कोणाची साथ देतात हे निवडणूक निकालाच्या नंतरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply