Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेस नेते सातव यांनी संजय राऊतांना हाणला ‘हा’ टोला; पहा काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :                              

Advertisement

महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील विसंवाद दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आता काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांनी टोला लगावला आहे. त्यावर राऊत काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

युपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देण्यात यावे असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली होती. राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी असे पटोले म्हणाले होते.

Advertisement

(1) Rajeev Satav on Twitter: “सध्या महाराष्ट्रात काही नाजूक प्रश्न आहेत.काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. बाकी, युपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ.” / Twitter

Advertisement

तर, आता सातव यांनी म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात काही नाजूक प्रश्न आहेत.काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. बाकी, युपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ.

Advertisement

एकूणच सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या पदाबाबत बोलल्याने सध्या राऊत हे काँग्रेस पक्षाच्या रडारवर आहेत. राऊत यांची वक्तव्य पाहता ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत हा प्रश्न पडला असल्याचा टोका पटोले यांनी अगोदरच लगावला होता. आता त्यात सातव यांनीही भर टाकली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply