मुंबई :
सुप्रसिद्ध उद्योजक आणि रिलायंस समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घरासमोर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या प्रकरणात आता आणखी एक खुलासा समोर आलेला आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या अडचणीत भर पडली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती याप्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज आलेले आहे. ज्यात वाझे स्पष्ट दिसत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. वाझेने 25 फेब्रुवारी रोजी अँटिलियासमोर स्कॉर्पिओ उभी केली होती. त्यावेळी गाडीत धमकीचे पत्र ठेवायला विसरला होता. पुढे गेल्यावर त्याच्या हे लक्षात आले. मग त्याने नोव्हा गाडीने परत येऊन हे पत्र ठेवले.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे. सर्व घडामोडीमध्ये वाझे एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातकैद झाला. त्यामध्ये त्याने पांढऱ्या रंगाचा सैल कुर्ता-पायजामा घातलेला होता. स्फोटकांनी भरलेल्या गाडीतील पत्रात म्हटले होते की, ‘प्रिय नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय, हे फक्त ट्रेलर आहे. पुढच्यावेळी आपल्या कुटुंबियांजवळ उड्डाण भरण्यासाठी पुरेसा सामान असेल. काळजी घ्या.’
राष्ट्रीय तपास यंत्रणेने यासंबंधी पुरावे गोळा करण्यासाठी वाझेकडून काही सीन रिक्रिएट केले आहेत. एनआयएने पाच गाड्या आणि महाराष्ट एटीएसने एक गाडी जप्त केली होती. आता ‘ऑउटलँडर’ गाडीचाही तपास चालू आहे. तपास यंत्रणेचे हाती मोठे पुरावे लागले असून यामुळे सचिन वाझेच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!
- म्हणून शेअर बाजारात तेजी; पहा सेन्सेक्स, निफ्टीची काय स्थिती
- अहमदनगर सर्वेक्षण : ‘झेडपी’बाबत नागरिकांचे आहे ‘हे’ मत; पंचायत समितीबाबत म्हटले जातेय ‘असे’..!
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे