Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. गुजरातकडे येणाऱ्या ‘त्या’ जहाजावर झाला होता मिसाईल हल्ला; पहा कोणी केली ही आगळीक..!

मुंबई :

Advertisement

इस्राइलच्या मालवाहू जहाजावर मिसाईल हल्ला झाला होता. गुजरातच्या दिशेने हे जहाज येत असतानाच त्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली होती. हे जहाज गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर दाखल झाले असून त्याचे फोटोही समोर आलेले आहेत.

Advertisement

हे जहाज तंजानियावरुन भारताकडे येत होते. यावेळी जहाजावर एक मिसाइल हल्ला झाला. हल्ल्यानंतर जहाजाचे इंजिन बिघडले. मात्र, तरीही कॅप्टन आणि क्र्यू टीमच्या प्रसंगावधान राखण्यासह इस्राइलच्या मार्गदर्शनाखाली हे जहाज आपल्या इच्छित स्थळी पोहोचले आहे.

Advertisement

भारत सरकारकडून या प्रकरणावर अधिकृतरित्या यावर कोणतीही टिपण्णी करण्यात आलेली नाही. इस्राइलने या हल्ल्यामागे इराणला दोषी ठरवले आहे. पण, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. अरबी समुद्रात हा हल्ला झालेला होता.

Advertisement

या जहाजाचा मालकी हक्क एक्सटी मॅनेजमेंटकडे आहे. ही कंपनी सध्या इस्राइलमधील पोर्ट सिटी हाइफामध्ये आहे. इस्राइलतर्फे यावर कोणती प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच याप्रकरणी आता हा देश कोणती कारवाई करतो याकडेही जगाचे लक्ष लागलेले आहे. कारण, यापूर्वीही 25 फेब्रुवारीच्या रात्री एमवी हेलियोस रे नावाच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूने इराणला दोषी ठरवले होते. पण, इराणने या आरोपांचे खंडन केले होते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply