Take a fresh look at your lifestyle.

तर ‘त्या’मध्येही बसणार भाजपला झटका; पहा महाविकास आघाडी कुठे करू शकतेय कुरघोडी..!

औरंगाबाद :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली बंडखोर शिवसेना नेते आणि राष्ट्रवादीने कॉंगेस-शिवसेना गटासमोर आव्हान उभे केले होते. त्यात भाजपला यशही आले. मात्र, त्याचवेळी भाजपच्या कमी आणि इतरांच्या जास्त जागा असे चित्र सध्या जिल्हा बँकेत निर्माण झालेले आहे. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजपवर कुरघोडी करण्याची आयती संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आली आहे.

Advertisement

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी ५ एप्रिल रोजी सभागृहात सकाळी ११ वाजता सभा अयोजित करण्यात आली आहे. भाजपच्या गटाकडून नितील पाटील यांच्या नावाची पूर्वीच घोषणा झाली असतानाच मंत्री अब्दूल सत्तार यांनी ऐनवेळी संचालक मंडळ जो निर्णय घेतील तो अंतिम राहिल, अशा प्रकारे घुमजाव करून वेगळेच काहीही होऊ शकते याचे संकेत दिले आहेत.

Advertisement

संचालक मंडळात एकूण २० सदस्य आहेत. यात हरिभाऊ बागडे, मंत्री अब्दूल सत्तार, मंत्री संदीपान भुमरे यांच्या पॅनलने १८ पैकी १४ तर काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्या पॅनलला केवळ ५ जागेवर विजय मिळाला आहे. तर, एकजण अपक्ष आहे. भाजपचे  पॅनल प्रमुख बागडे यांचा पराभव झाला आहे.

Advertisement

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे महाविकास आघाडी संचालक संख्या बळ जास्त असल्याने हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपला यामध्ये कोणतीही संधी नसेल. मात्र, अगोदरच एकत्र येण्यात कमी पडलेल्या या तिन्ही पक्षाच्या नेत्यांची मोट कोण बांधणार हाच यातील कळीचा मुद्दा आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply