Take a fresh look at your lifestyle.

यशकथा : सोडले विचार जुने, संधीचे केले सोने; वाचा प्रयागाताई यांची भन्नाट स्टोरी

अहमदनगर :

Advertisement

दररोज दुसऱ्या शेतात कामाला जाणे. पती बांधकामाच्या कामावर मजुरी करायचे. दोन मुलांचे शिक्षण आणि संसार चालविता त्यांचा जीव मेटाकुटीला याचा. त्या महिला बचत गटात सामील झाल्या आणि त्यातून सुखी आयुष्याचा एक धागा मिळाला. जिल्हा परिषदेच्या साईज्योती स्वंयसहायता यात्रेत थालपीठचा स्टॉल लावला. त्यामुळेच आज सोयाबीन चिली नावाचा स्वतंत्र बॅंड तयार करता आला अन्‌ त्यांचं जगण सुसाह्य झालं.

Advertisement

ही यश कथा आहे प्रयागाताई प्रकाश लोंढे (रा. शेंडी, ता. नगर) यांची. 2014 मध्ये प्रयागाताई दुसऱ्याच्या शेतावर कामाला जात होत्या आणि त्याचे पती बांधकाम व्यावसायिकाकडे मजुरी करीत होते. घरी सासू-सासरे व दोन मुले होती. मुलांचे शिक्षण सुरू असल्याने मजुरी करून कुटुंब चालविणे मुश्‍किल झाले होते. त्यामुळे प्रागायाताईने महिलांच्या बचत गटामध्ये सहभाग नोंदविला. पुढे त्याच बचत गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतर्फे भरविण्यात येणाऱ्या साईज्योती स्वंयसहायता यात्रेमध्ये 2015 मध्ये थालपीठचा स्टॉल लावला. त्यातून चांगले पैसे मिळाले. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून दरवर्षी तिथे स्टॉल लावणे सुरू केले. परंतु, थालपीठचा स्टॉल अनेकजण लावीत होते. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली.

Advertisement

त्याचवेळी घरगुती बनविलेल्या सोयाबीन चिलीचा स्टॉल लावला. त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून नगर शहरामध्ये कुठेतरी रस्त्यावर स्टॉल लाऊन सोयाबीन चिलीचा प्रयोग करावा, असे म्हणून गुलमोहर रस्त्यावरील पोलीस चौकीजवळ हातगाडीवर सोयाबीन चिलीचे छोटे हॉटेल सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दोन्ही मुलांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले. प्रकाश लोंढे यांनी रोजंदरीवर जाणे सोडून दिले आणि पूर्णवेळ सोयाबीन चिलीसाठी ते प्रयागाताई यांना मदत करू लागले. मुलगा सूरजही मदत करू लागला.

Advertisement

दरम्यान, मार्केट यार्डजवळील महात्मा फुले चौकात त्यांनी सोयाबीन चिलीची दुसरी शाखा सुरू केली. त्यासाठी चारचाकी वाहन बनवून घेतले. परंतु, लॉकडाउन झाल्याने ते सर्वकाही बंद झाले. त्यामुळे प्रयागाताई लोंढे यांनी नगर-औरंगाबाद रस्त्यावरील वांबोरी फाटा येथे सोयाबीन चिलीचा स्टॉल सुरू केला. तिथेही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. आज त्या स्वत: चारचाकी वाहन चालवून सर्व कामे करतात. बचत गटातून दिशा मिळाल्याने त्यांचे आयुष्य बदलून गेले.

Advertisement

सोयाबीन चिलीने संसाराची घडी बसविली. रहायला घर नव्हते. आज चांगले घर बांधले असून, दोन्ही मुले उच्चशिक्षित झाले आहेत. बचत गटाने मला उभ केल्याचा मला खूप आनंद वाटतो. लोक मला सोयाबीन चिलीचे फ्रांचायझीबाबत विचारीत आहेत. @ प्रयागाताई लोंढे, व्यावसायिक

Advertisement

लेखन व संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply