Take a fresh look at your lifestyle.

शेळीपालन : म्हणून अर्धबंदिस्त गोट फार्मिंग करावे; वाचा याचे फायदे-तोटे व इतर माहिती

पूर्णपणे बंदिस्त अर्थात ठाणबंद शेळीपालन याचे फायदे-तोटे पाहिल्यानंतर आता आपण खऱ्या अर्थाने किफायतशीर व नफ्याचा वाटा वाढवणाऱ्या अर्धबंदिस्त शेळीपालन याबाबतची माहिती पाहणार आहोत. अशा पद्धतीने केलेले शेळीपालन यशस्वी ठरल्याची हजारो उदाहरणे सापडतील. मात्र, यामध्ये योग्य पद्धतीने व्यवस्थापन करूनच चांगला नफा मिळू शकतो. नाहीतर, यातही धोका आहेच की..!

Advertisement

ठाणबंद पद्धतीत शेळ्या व बोकड यांना अजिबातच चरण्यासाठी बाहेर सोडले जात नाही. तर, परंपरागत पद्धतीत शेळ्यांना किमान ८-१० तास चरण्यासाठी कुरण, डोंगर किंवा मोकळ्या शेतात नेले जाते. या दोन्हींचा सुवर्णमध्य साधून केलेले गोट फार्मिंग म्हणजे अर्धबंदिस्त शेळीपालन. यामध्ये शेळ्यांची योग्य निगा राखणे शक्य होते. तसेच शेळ्या व बोकडांना त्यांच्या चंचल स्वभावानुसार किमान ४-५ तास मोकाट फिरून वेगवेगळ्या वनस्पती व गवत असा चारा खाता येतो. त्याद्वारे मग त्यांचे सर्वांगीण पोषण होते. परिणामी चारा व औषधोपचार यावरील खर्चही कमी होऊन नफ्यात वाढ होते.

Advertisement

अर्धबंदिस्त शेळीपालनाचे फायदे :

Advertisement
 • शेळ्यांचा व्यायाम होत असल्याने त्यांची पचनक्षमता उत्तम राहते.
 • सर्व प्रकारच्या वनस्पती या पद्धतीत खायला मिळण्याची शक्यता असल्याने वजनवाढ चांगली असते.
 • पोषक चारा आणि खुराक मिळाल्याने शेळ्या व बोकड यांची वाढ व्यवस्थित होते.
 • ठाणबंद शेळीपालनाच्या तुलनेत या पद्धतीत शेळ्यांचा गाभ जाण्याचे (गाभडणे) आणि कराडांच्या मृत्यूचे प्रमाण खूप कमी असते.
 • गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवण्यासाठी वेळ मिळत असल्याने प्राण्यांचे आरोग्य उत्तम राहते.
 • ठाणबंद आणि परंपरागत मोकाट पद्धतीपेक्षा ही पद्धत खूप चांगली असल्याचे सिद्ध झालेले आहे.
 • शेळ्यांची काळजी घेणे व करडे आणि गाभण शेळ्या यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवणे या पद्धतीने सहजशक्य आहे.
 • यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी यापैकी एका वेळेला शेळ्या सोडल्या जात असल्याने त्यांचा व्यायाम होतो.
 • यामध्ये मनुष्यबळ आणि त्यांचे श्रमही खूप कमी लागते.
 • चारा आणि आरोग्य यावरील खर्चात अनुक्रमे २० आणि ५० टक्के बचत होऊ शकते.

या पद्धतीचे खूप महत्वाचे असे तोटे नाहीत. मात्र, यामध्येही प्राण्यांची काळजी घेऊनच आपण नफा कमवू शकतो हे कोणीही विसरू नये.

Advertisement

अर्धबंदिस्त शेळीपालनाचे महत्वाचे मुद्दे :

Advertisement
 • या पद्धतीमध्ये ठाणबंद व मोकाट पद्धती यांचा सुवर्णमध्य ठेऊन नियोजन करावे.
 • आपल्या वेळेनुसार मात्र शक्यतो एकदा ठरलेल्या पद्धतीनेच सकाळी किंवा संध्याकाळी यापैकी एकाच टप्प्यात कळपाला चरायला घेऊन जाणे.
 • ज्या टप्प्यात शेळ्यांना चरण्यासाठी नेणे शक्य नसते, अशावेळी त्यांना खुराक आणि ओला-सुका कचरा देण्याचे नियोजन करावे.
 • गाभण शेळ्यांना शेवटचे एक-दीड महिने गोठ्यातच ठेवावे.
 • लहान करडे व नुकत्याच विलेल्या शेळ्या यांना गोठ्यातच स्वतंत्र कप्प्यात ठेवण्याचे नियोजन करावे.
 • सर्व शेळ्या एकाचवेळी गाभण राहण्याचे किंवा ज्यावेळी बोकडांना जास्त मागणी असते अशा कालावधीत गाभण ठेवण्याचे नियोजन करण्यासाठी बोकडांना वेगवेगळे ठेवावे.
 • गोठ्यातील ओलसरपणा अजिबात राहणार नाही व कळपातील प्राण्यांना गोचीड व इतर पराजीविंचा त्रास होणार याची काळजी घ्यावी.
 • दुध तोडलेले आणि ३ महिने वयाचीच करडे शेळ्यांच्या कळपासोबत चरावायला सोडवीत.
 • शेळ्यांना चरायला सोडल्यावर लांडगे व भटके कुत्रे यांच्यापासून संरक्षण देण्यासाठी शेळीपालक सदृढ व धडधाकट असावेत.
 • शेळ्यांना योग्यअसे सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवनसत्व असलेला खुराक व चारा देण्याचे नियोजन करावे.

(क्रमशः)

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply