Take a fresh look at your lifestyle.

तर नगरमध्ये काँग्रेसचा महापौर; ‘त्या’निमित्ताने थोरातांनी दिले शिवसेना, राष्ट्रवादीला आव्हान

अहमदनगर :

Advertisement

शहरात सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन महाविकास आघाडीचे घटकपक्ष तुल्यबळ आहेत. मात्र, या दोन्हींच्या भांडणात कमी जागा असूनही राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर भाजपकडे महापौर हे पद आहे. त्याच पदावर आता काँग्रेस पक्षाचेही लक्ष गेले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीच याचे सुतोवाच केले आहे.

Advertisement

शहर जिल्हा काँग्रेची  संघटनात्मक आढावा बैठक थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी त्यांनी याबाबत सुतोवाच केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आलेले आहे. थोरात यांनी म्हटले आहे की, काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शास्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.  किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचा होईल.

Advertisement

ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हाण, राजेंद्र नागवडे, संपतराव म्हस्के, फारुख शेख, अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, निजाम जहागीरदार, गणेश आपरे, शंकर आव्हाड, जरीना पठाण, उषा भगत, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष अज्जू शेख, सेवादल अध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, नलिनी गायकवाड, महिला सेवादल अध्यक्ष कौसर खान, सुमन कालापहाड, शबाना शेख, भिंगार काँग्रेसचे कॅ. रिजवान शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Advertisement

थोरात म्हणाले की, संघटनात्मक फेरबदल करत असताना नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या रूपाने नवीन दमाचा चेहरा पक्षाने दिला आहे. शहरामध्ये काँग्रेस जोमाने काम करत आहे. मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. शहरातल्या विविध घटकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व ताकद काळे यांच्या पाठीशी उभी केली जाईल. 

Advertisement

काळे यांनी अनेकदा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना आव्हान दिलेले आहे. एकाच पक्षात असतानाही काळे यांनी बंडखोरी करूज जगताप यांच्या विरोधात उमेदवारी केली होती. त्यात काळे यांना अपयश आल्यावर त्यांनी काँग्रेस पक्षात काम सुरू केले. पक्षाने त्यांना ताकद दिली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply