Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे, आजपासून बँका एवढे दिवस बंद; कामे खोळंबणार..!


मुंबई :

आर्थिक वर्ष संपत आले असताना मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात बँका तब्बल काही दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आपली कामे आता पुढे ढकलावी लागणार आहे. आज शनिवारपासून बँका बंद राहणार आहेत. आर्थिक वर्ष समाप्ती आणि सुट्ट्या यांमुळे आजपासून म्हणजे २७ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत. यामध्ये केवळ ३० मार्च आणि ३ एप्रिल हे दोन दिवसच बँकेतील कामकाज सुरू राहील. त्यामुळे बँकेत एखादं महत्त्वाचं काम असल्यास ते या दोन दिवसात करावं लागणार आहे किंवा ते पुढं ढकलावं लागणार आहे.

Advertisement

२७ मार्च म्हणजे आज चौथा शनिवार असल्याने बँका बंद आहेत. त्यानंतर २८ मार्च रोजी रविवार आणि २९ मार्च रोजी बँकांना होळीची सुट्टी आहे. त्यानंतर ३० मार्च रोजी मात्र बँका सुरू राहणार आहेत. ३१ मार्चला सुद्धा बँका सुरू असतील मात्र, यादिवशी आर्थिक वर्ष संपत असल्याने बँकात इयर एंडिंगची कामे सुरू राहणार असल्याने नागरिकांसाठी बँका बंद राहतील. त्यानंतर एक एप्रिल रोजीही नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने बँकांमध्ये वार्षिक खाती बंद करण्याचं काम केलं जातं, त्यामुळं बँक ग्राहकांसाठी बंद असेल.

Advertisement

२ एप्रिल रोजी गुड फ्रायडेची सुटी आहे. ३ एप्रिल रोजी शनिवारी बँका सुरू असतील. ४ एप्रिल रोजी रविवार असल्यानं बँकांना सुट्टी असेल. अशा रीतीनं चार एप्रिलपर्यंत फक्त दोन दिवस बँकेतील कामं ग्राहकांना करता येतील. तेव्हा त्यानुसार आपल्या कामाचं नियोजन करा. दरम्यान, या काळात नागरिकांना बँकेत जाता येणार नसले तरी ऑनलाइन बँकिंग मात्र सुरू राहणार आहे. या काळात ऑनलाइन बँकिंगद्वारे व्यवहार करता येतील.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply