Take a fresh look at your lifestyle.

व्यावसायिकांना झटका; परप्रांतीय मजुरांनी धरला गावाकडचा रस्ता, पहा काय बसणार फटका

अहमदनगर :

Advertisement

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अशावेळी कोणत्याही क्षणी लॉकडाऊन लागू होऊ शकतो असेच म्हटले जात आहे. आताही युरोप आणि अमेरिकेत तब्बल महिनाभर किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीचा लॉकडाऊन लागू झाल्याने आपल्याकडे असेच होऊ शकत असल्याच्या अफवा आहेत. त्यातच राज्य सरकारकडून याबाबत सुतोवाच केले जात असल्याने परप्रांतीय मजुरांनी पुन्हा एकदा गावाकडची वाट धरली आहे.

Advertisement

अहमदनगरसह पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि सोलापूर भागातील स्थानिक माध्यमांनी याबाबत बातम्या दिलेल्या आहेत. एकूनच अवघ्या महाराष्ट्रात सध्या व्यावसायिकांना मजुरांच्या टंचाईला यामुळे सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील कामगार अनेक ठिकाणी हॉटेल, खानावळ, कंपन्या आणि दुकानात कामाला आहेत. त्यांनी लॉकडाऊनचा धसका घेऊन काम सोडून गावाला जाण्याची तयारी केली आहे. काहींनी तर प्रस्थानही केले आहे.

Advertisement

मागील लॉकडाऊनची सुरुवात वर्षभरापूर्वी झाली त्यावेळी सरकारने कोणत्याही सोयी-सुविधा लक्षात न घेता मजुरांना वणवण कार्याला सोडले होते. करोनापेक्षा प्रवासात जास्त मजुरांचा मृत्यू झाल्याचे आकडे समोर आलेले आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या अशा निर्णयाचा पुन्हा एकदा फटका बसू नये म्हणून मजुरांनी अगोदरच तयारी केली आहे.

Advertisement

औद्योगिक वसाहतीत फेरफटका मारला असता कामगारांचे जथ्थे गावाकडे निघाल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे. याबाबत नागापूर येथील दीपककुमार या बिहारी मजुराने म्हटले की, मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन लागू केल्यावर मजुरांचे हाल झाले. केंद्र किंवा राज्य सरकारने आमच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे आम्ही यंदा अगोदरच तयारीत आहोत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply