Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ८१९ रुपयांचा सिलेंडर फ़क़्त ११९ रुपयांना; पाहिजे तर मग फक्त ‘एवढेच’ करा की..!

पुणे :

Advertisement

एकीकडे करोनाचे वाढत जाणारे संकट आणि दुसरीकडे वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गॅस टाकीच्या किमती वाढत असल्याने बजेट कोलमडले आहे. यावर्षी एलपीजी सिलिंडर १२५ रुपयांनी महागला आहे. दिल्लीतील १४.२ किलो सिलिंडरला यंदा जानेवारीत ६९४ रुपयांत मिळत होता त्याची किंमत आता ८१९ रुपयांवर गेली आहे. अशा परिस्थितीत डिजिटल पेमेंट अ‍ॅप आधारित कंपनी पेटीएमने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत आपण ८१९ रुपयांचा एलपीजी सिलिंडर ११९ रुपयांमध्ये घेऊ शकता. म्हणजेच ७०० रुपयांची संपूर्ण बचत करता येईल.

Advertisement

 यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये पेटीएमचे अॅप असणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही पेटीएम अॅपवरून पहिल्यांदा एलपीजी सिलिंडर बुक कराल आणि अ‍ॅपद्वारे पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला ऑफरअंतर्गत ७०० रुपये कॅशबॅक मिळतील. पेमेंट केल्यावर आपल्याला एक स्क्रॅच कार्ड मिळेल, जे आपण स्क्रॅच करून ऑफर पाहू शकता. जर आपण स्क्रॅच कार्ड उघडले नसेल तर आपण नंतर पेटीएम अ‍ॅपमध्ये कॅशबॅक आणि ऑफर्स सेक्शनमध्ये जा आणि नंतर ते स्क्रॅचमधून देखील लागू करू शकता. या ऑफरची मुदत ३१ मार्चपर्यंत राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. द

Advertisement

रम्यान, देशभरात सध्या एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. करोना महामारी संकटाच्या काळात या नव्या संकटाने सर्वसामान्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे काही दिलासाही मिळाला आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply