Take a fresh look at your lifestyle.

‘त्यासाठी’ पालकमंत्री भुजबळ उतरले थेट रस्त्यांवर; केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

नाशिक :

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची जनतेशी असलेलेई नाळ घट्ट आहे. त्याचाच उपयोग करून करोनाच्या संकटकाळात जनतेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न भुजबळ यांनी केला आहे.

Advertisement

शुक्रवारी (दि. २६) पालकमंत्र्यांनी गर्दीच्या ठिकाणी पाहणी करत परिस्थितीचा अाढावा घेतानाच लोकांना मस्क लावणे आणि काळजी घेऊन व्यवहार करण्याचे आवाहन केले. अनलाॅकनंतर काेराेनाने पुन्हा डाेके वर काढले अाहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहर हाॅटस्पाॅट बनले अाहे. रुग्णसंख्येत नाशिकचा क्रमांक देशात पाचव्या स्थानी अाल्याने पालकमंत्री भुजबळ यांनी अॅक्शन माेडवर येऊन जनजागृती सुरू केली आहे.

Advertisement

सिडकाे परिसरातील पवननगर भाजी मार्केट येथून भुजबळ यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली.  ठक्कर बसस्थानक परिसराची पाहणी केल्यानंतर बसस्थानकाबाहेरील काही रिक्षाचालक विनामास्क दिसल्याने भुजबळांनी या रिक्षाचालकांविराेधात कारवाई करण्याबाबत पाेलिसांना सूचना केल्या. तसेच परिसरातील चहा व्यावसायिकांसाेबत संवाद साधत नियमांचे पालन करण्याबाबत अावाहन केले.

Advertisement

शालिमार, मेनराेडपासून थेट रविवार कारंजा परिसरातपर्यंत भुजबळांनी पाहणी करतानाही नागरिकांना आवाहन केले. नागरिकांनी मास्क घातलेला नसल्यास त्यांना हात जाेडत ‘काेराेनाचा धाेका वाढतच अाहे… बाबांनाे अाता तरी मास्क घाला’, अशी विनवणी भुजबळ यांनी केली.

Advertisement

पालकमंत्र्यांनी अचानक दाैरा सुरू केल्याने या परिसरातील दुकानदारांसह पाेलिस अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांचीदेखील धावपळ उडाली. काेराेनाचा अालेख दिवसेंदिवस अधिकच उंचावत अाहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात अाणण्यासाठी पालकमंत्रीच रस्त्यावर उतरले असल्याने आता प्रशासन आणखी सक्रीय झालेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply