Take a fresh look at your lifestyle.

म्हणून वाढणार भारताचेही टेन्शन; पहा काय आहे नेमके कारण, चीनचा काय आहे त्यात हात..!

तेहरान :

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून जगात भारताचा दबदबा वाढला आहे. देशाच्या सामर्थ्याची ओळख झाली आहे. त्यामुळे जागतिक घडामोडीत भारतासारख्या मोठ्या देशाकडे दुर्लक्ष करणे आज कोणत्याही देशाला परवडणारे नाही. मात्र, भारताचे वाढत असलेले हे सामर्थ्य अनेक जणांना त्रासदायकही ठरत आहे.

Advertisement

त्यामुळे अडचणी आणण्यासाठी काही देशांकडून अटोकाट प्रयत्नही सुरू आहेत. असे काही निर्णय घेतले किंवा घेण्याची तयारी केली जात आहे ज्यामुळे भारताचे टेन्शन वाढणार आहे. भारताच्या कुरापती काढण्यात चीन सध्या आघाडीवर आहे. आताही चीन आणि भारताचा मित्र असलेल्या इरानमध्ये काही महत्वपूर्ण करार होऊ शकतात.

Advertisement

इराण आणि चीनने येत्या दहा वर्षात द्विपक्षीय व्यापार दहा पट वाढवून सहाशे अब्ज डॉलर्स करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दोन देश जेव्हा अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जात आहेत अशा वेळी हा करार करणार आहेत. इराण आणि चीन यांच्यातील कराराचा तपशील अद्याप आलेला नाही. परंतु, असे मानले जाते की यात ऊर्जा आणि पायाभूत सुविधांसारख्या इराणच्या महत्त्वाच्या क्षेत्रात चीनच्या गुंतवणूकीचा समावेश आहे.

Advertisement

चीन हा इराणचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. इराणच्या संवाद एजन्सीच्या मते, चिनी परराष्ट्रमंत्र्यांच्या या दोन दिवसांच्या दोऱ्यात सर्वसमावेशक सहकार्याच्या करारावर स्वाक्षरी होईल. कराराच्या अगोदर, इराणने अमेरिका आणि युरोपियन युनियनकडे आपले म्हणणे कठोर केले आहे. दरम्यान, इराणच्या अणुकरारांचे रक्षण करण्यासाठी आणि चीन-इराण संबंधांच्या वैधानिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही चीनने जाहीर केले आहे.

Advertisement

इराणकडून विक्रमी प्रमाणात तेल खरेदी केली जात असताना चीनने ही टिप्पणी केली आहे. चीन आणि इराणमधील हा करार यशस्वी झाल्यास भारताला मोठा धक्का बसू शकेल. चीनने या भागात आपली लष्करी धारण कायम ठेवल्यास पश्चिम आशियामध्ये अमेरिकेच्या लष्करी प्रभावात संकट निर्माण होईल. आफ्रिकेच्या जिबूती येथे चीनने यापूर्वीच विशाल नौदल तळ बांधला आहे. विश्लेषकांच्या मते या करारामुळे भारतालाही धक्का बसू शकेल.

Advertisement

इराणच्या बंदर चाबहारच्या विकासावर भारताने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. अमेरिकेच्या दबावामुळे इराणशी भारताचे संबंध गंभीर टप्प्यात आहेत. चाबहार हे धोरणात्मक तसेच व्यावसायिक दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. हे पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापासून अवघ्या १०० किलोमीटर अंतरावर आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply