Take a fresh look at your lifestyle.

‘मोदीजी.. हद्द झाली राव.. किती फेकणार..!’; पटोले यांनी हाणला भाजपला टोला

मुंबई :

Advertisement

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सवाल केला आहे की, मोदीजी, अजुन किती फेकणार? आमच्या मराठीत एक म्हण आहे, हद्द झाली राव..!

Advertisement

याला निमित्त ठरले आहे ते मोदी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याबाबत केलेल्या वक्तव्याचे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले होते. हे आंदोलन माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनामधील एक होते. त्या वेळी मी 20-22 वर्षांचा असेल, असे मोदींनी म्हटले होते. त्यावरून ते सध्या चर्चेत आहेत.

Advertisement

त्यावर पटोले यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, और कितना फेकोंगे मोदी जी….. हमारे मराठी मे एक लाईन है…. हद झाली राव.. किसान आंदोलन कर कर एक शब्द तक आपके मुह से निकला नही…. और आझादी की बात करने बांग्लादेश जाते हो…… किसानो को आंदोलनजीवी आपने कहा था…. आप कोण हुए अब ढोंगीजीवी.

Advertisement

शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल एक शब्दही आपल्या तोंडातून निघाला नाही आणि स्वातंत्र्याच्या बाता मारण्यासाठी बांगलादेशामध्ये गेला आहात? शेतकऱ्यांना तुम्हीच ‘आंदोलनजीवी’ म्हणाला होतात. मग आपण कोण आहात, ‘ढोंगजीवी’, असल्याचा टोला पटोले यांनी लगावला आहे. मोदी यांच्यावरील ही टीका भाजपला चांगलीच जिव्हारी लागली आहे.

Advertisement

प्रशांत कुलकर्णी यांनी यावर पटोले यांना लिहिले आहे की, वाटोळं झालेल्या पक्षात पाटोळे गेले आणि त्यामुळे त्यांचे पण वाटोळे झाले । पक्षनेतृत्वा ने केलेल्या घोटाळें बद्दल पाटोळे यांना वेगळे सांगायला नको । ते जामिनावर बाहेर आहेत ह्याची कल्पना आहे का? आणि बाय द वे महाराष्ट्रात काकांचा पक्ष तुम्हाला काडीचीही किमंत देत नाही याचं काय ते बघा।

Advertisement

प्रशांत यांनी म्हटले आहे की, ते आहेतच फेकू पण आपणही काय कमी नाही नाना, दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या सरळ सेवा स्पर्धा परीक्षा बद्दल आपल्या सरकार मधील एकही मंत्री बोलायला तयार नाही. तर, कृष्णा सरवदे यांनी म्हटले आहे की, आम्हा OBC, SC, ST, VJ-A, NT-C, NT-D मागासवर्गीय मुलावर अन्याय झाला आहे. दोन वर्षापासून विद्युत सहायक भरती ची वाट पाहून पाहून आम्ही संताप झालो आहोत. आमची सहनशीलता संपली आहे. महावितरण ने एक तर विद्युत सहायक लिस्ट लावावी नाहीतर आम्हाला फाशी घेण्यास परवानगी द्यावी.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply