Take a fresh look at your lifestyle.

पंढरपूर पोटनिवडणूक : गोडसेंच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी..!

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी मिळणार असेच चित्र निर्माण झालेले आहे. मात्र, त्याचवेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी शुक्रवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

जनतेच्या आग्रहाखातर उमेदवारी करीत असून अजिबात माघार घेणार नसल्याचे गोडसे यांनी उमेदवारी अर्ज भरतानाच स्पष्ट केले आहे. त्यामुळे येथे यंदाही तिरंगी किंवा प्रसंगी चौरंगी लढत होईल अशीच शक्यता व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुपारी समर्थकांसह येथील प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडीतून येऊन गोडसे यांनी दणक्यात अर्ज दाखल केला आहे.

Advertisement

गोडसे यांचा एकून अर्ज भरण्याचा आणि प्रचाराचा दणका लक्षात घेता त्यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार असल्याचा संदेश दिला आहे. गोडसे यांचा मतदारसंघात संपर्क असून विविध प्रश्नांवरील आंदोलनात नेहमी सहभाग असतो. मागील विधानसभा निवडणुकीतही त्या इच्छुक होत्या. परंतु युतीत ही जागा भाजपकडे गेल्याने त्यांना थांबावे लागले होते. आता पोटनिवडणुकीत त्यांनी लढण्याचा निश्चय व्यक्त केला आहे.

Advertisement

शिवसेनेसह महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती. दोघांकडून काहीच उत्तर न आल्याने जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवत असल्याचे गोडसे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनीही यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला या ठिकाणी एकीचे बळ दाखवणे कितपत शक्य होणार हा मुद्दा आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply