Take a fresh look at your lifestyle.

वाहनचालकांना दिलासा; सरकारने ‘त्यासाठी’ दिली मुदतवाढ, पहा काय होणार परिणाम

दिल्ली :

Advertisement

देशभरात करोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांच्या नुतनीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मुदतवाढ दिली आहे. या निर्णयानुसार ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, पीयुसी किंवा इतर कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे किंवा ३१ मार्च २०२१ रोजी संपणार आहे, अशांसाठी ही मुदतवाढ आहे.

Advertisement

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवारी यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मागील वर्षी करोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले होते. तेव्हापासून कागपत्रांचे नुतनीकरण करण्यात अडचणी भेडसावत होत्या. यासाठी केंद्र सरकारने या आधी सुद्धा मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता या वर्षातही करोनाचा प्रकोप वाढत आहे.

Advertisement

दररोज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे निर्बंध आधिक कठोर करण्यात येत आहे. पुन्हा लॉकडाउन होणार का, याबाबतही चर्चा सुरू आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करुन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कागदपत्रांच्या नुतनीकरणासाठी मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातील वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. 

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply