Take a fresh look at your lifestyle.

संशोधन : त्यामुळे ‘हीट टॅक्स’ही देण्याची ठेवावी लागेल तयारी; ‘तो’ करभार वाढण्याची शक्यता

दिल्ली :

Advertisement

जगभरात सध्या हवामान बदल आणि त्याचे दुष्परिणाम हा विषय ऐरणीवर आलेला आहे. अशावेळी आता भविष्यात काय वाढवून ठेवले असेल असाच प्रश्न जगाला पडला आहे. त्याला जोरदार निमित्त ठरले आहे ते करोना विषाणूच्या साथीच्या रोगाचे. अशावेळी भविष्यात भारतासह अनेक देशातील जनतेला ‘हीट टॅक्स’ द्यावा लागेल असे संशोधकांना वाटत आहे.

Advertisement

मेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने जागतिक हवामान बदलांशी संबंधित एक महत्वाचे संशोधन केले आहे.त्यानुसार वार्षिक एक अंश सेल्सिअस तापमान वाढल्याने भारतासारख्या देशांतील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधील उत्पादकता दोन टक्क्यांपेक्षा जास्त घट येत असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आलेला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Advertisement

एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटमध्ये साउथ आशिया विभागाचे संचालक डॉ. अनंत सुदर्शन यांनी या अहवालाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, तापमान वाढल्याने पिकांच्या उगवणक्षमतेवरील विपरीत परिणाम आधीच्या संशोधनातून स्पष्ट झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहेच. त्याचबरोबर नव्या संशोधनातून असेही स्पष्ट झालेले आहे की, वाढते तापमान श्रम उत्पादकत कमी करण्यासोबतच इतर क्षेत्रांतील महसुलाचेही नुकसान करते.

Advertisement

डॉ. सुदर्शन यांच्यासह भारतीय सांख्यिकी संस्थेचे ई. सोमनाथन, दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या रोहिणी सोमनाथन आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनाच्या मीनू तिवारी हे या संशोधन अहवालाचे सहलेखक आहेत. दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, सुरत, भिलाई, छिंदवाडासह देशभरातील ५८ हजारांवर कापड गिरण्या, शिलाई कारखाने, स्टील मिल व हिरा वर्कशॉप आदि ठिकाणच्या डाटावरून हा संशोधन अहवाल तयार करण्यात आलेला आहे.

Advertisement

निर्मिती क्षेत्रात महाशक्ती व्हायचे असेल तर अत्यंत गंभीरपणे विचार करण्यासह कामगारांना उष्ण वातावरणापासून वाचवण्यासाठी कमी खर्चातील तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply