Take a fresh look at your lifestyle.

म्हणून शेती औजारे व पाणी व्यवस्थापन उपकरणांची भाववाढ झाली 70 टक्के..!

पुणे :

Advertisement

एकीकडे करोनाचे वाढते रुग्ण आणि लॉकडाऊन यांची चर्चा असल्याने शेतमालाचे भाव कोसळले आहेत. त्याचवेळी उन्हाळी हंगामासाठी लागणाऱ्या पाणी व्यवस्थापन उपकरणांसह शेतीच्या औजारांमध्ये भाववाढ झाली आहे. या वस्तूंचे भाव वर्षभरात तबल 70 टक्के वाढले आहेत.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने आता थेट भारतीय शेतकऱ्यांनाच याचा फटका सहन करावा लागला आहे. त्यातच पेट्रोल आणि डीझेल या इंधनाच्या दरवाढीचा फटकाही बसला आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने अनेक छोटे उद्योग बंद पडले आहेत. त्यातच पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी गाठल्याने वाहतूक खर्चाततही वाढ झाली असल्याने शेती औजारे व पाणी व्यवस्थापन उपकरणांची भाववाढ झाली आहे.

Advertisement

शेतीसाठी लागणारे पीव्हीसी पाईप, कटर, घमेले, बादल्या, पाण्याची टाकी, ठिबक सिंचनासह बांधकाम व्यवसायासाठी लागणारे ड्रेनेज व प्लंबिंगचे पाइप या सर्वच वस्तूंच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी पीव्हीसी पाइप, तुषार सिंचन ठिबक सिंचनाचा वापर आता जास्त खर्चिक झाला आहे.

Advertisement

पीव्हीसी पाइपचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला. कंपनी मागणीच्या तुलनेत माल कमी पाठवत आहे. उत्पादनाच्या तुलनेत पाईप व इतर अवजारांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. 

Advertisement

सध्याचे बाजारातील भाव :

Advertisement

२.५ इंची पीव्हीसी पाइप : ६७० रुपये
३ इंची पीव्हीसी पाइप : ९५५ रुपये
४ इंची पीव्हीसी पाइप : १३७० रुपये
ठिबक सिंचन पाइप (५०० मीटर) : ४३०० रुपये

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply