Take a fresh look at your lifestyle.

येथे भाजपला मिळणार चक्क भोपळाच; पहा कुणी केलाय हा राजकीय दावा

तिरुअनंतपुरम :

Advertisement

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. केरळमध्ये ६ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकी आधी होत असलेल्य सर्वेक्षणात डाव्या पक्षांची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसने मात्र हा अंदाज फेटाळला आहे. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री जरी येथे आले तरी राज्यात भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा दावा काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी केला आहे.

Advertisement

चेन्निथला पुढे म्हणाले, की डाव्या पक्षांच्या सरकार विरोधात केरळच्या जनतेत असंतोष आहे. हे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपला येथे यश मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी वेळ वाया घालवू नये असेही त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसने नवीन उमेदवारांना संधी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे १६० जागांपैकी ५५ जागावंर नव्या उमेदवारांना संधी दिली आहे.

Advertisement

काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनवला आहे. काँग्रेसनं केरळमध्ये सत्तेत आल्यास न्याय योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेस पक्षाने यावेळी आसाम आणि केरळ या राज्यांवर जास्त लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये तर काँग्रेस कुठेच दिसत नाही. पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला तरी सुद्धा पक्षाचे स्टार प्रचारक बंगालमध्ये फिरकले नाहीत.  

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply