Take a fresh look at your lifestyle.

महिला अधिकाऱ्यांच्या आत्महत्येनंतर आली सरकारला जाग; पहा नेमके काय म्हटलेय मंत्र्यांनी

मुंबई :

Advertisement

हरीसाल, ता. धारणी (जि. अमरावती) येथे कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी महिलेचा मृत्यू वन विभागाच्या अंतर्गत घडामोडीतून गेल्याचे सुसाईड नोटमुळे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कुठे महाराष्ट्र सरकारमधील जबाबदार मंत्र्यांना विशाखा समित्या स्थापन करण्याच्या मुद्द्याचे महत्व पटले आहे.

Advertisement

भारतात आणि महाराष्ट्र राज्यातही एखादी दुर्दैवी घटना घडल्यावर मगच राजकीय पक्ष, सरकारी यंत्रणा आणि नेत्यांना जाग येत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. आताही तसाच प्रकार घडला आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

तसेच कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार राज्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समित्या स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या असून जर कोठे या समित्या कार्यान्वित नसल्यास त्या तातडीने पंधरा दिवसांच्या आत कार्यान्वित कराव्यात तसेच या समित्यांच्या नियमित बैठका घेऊन महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात यावे, असे निर्देशही ॲड. ठाकूर यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

Advertisement

 एकूणच आता एक महिला अधिकाऱ्याला महाराष्ट्र राज्याने गमावल्यावर कुठे सरकारच्या जबाबदार मंत्र्यांना असे निर्देश देऊन ठोस कार्यवाहीसाठी दबाव आणण्याचे सुचले आहे. हरीसाल, ता. धारणी (जि. अमरावती) येथे कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करून निलंबित करावे, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Advertisement

श्रीमती दिपाली चव्हाण यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळ्या घालुन दि. 25 मार्च, 2021 रोजी आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदराचे उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तरी या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्वरित निलंबन करण्यात यावे, अशी मागणी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply