Take a fresh look at your lifestyle.

म्हणून सरकारी तिजोरीत आले ३० हजार कोटी; पहा नेमके कुठून आलेत हे पैसे

दिल्ली :

Advertisement

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडून वितरीत केलेल्या लाभांशातून केंद्र सरकारने बक्कळ कमाई केली आहे. केंद्र सरकारच्या तिजोरीत हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत. केंद्र सरकारला जवळपास ३० हजार ३६९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 

Advertisement

सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, सरकारने सार्वजनिक उपक्रमांच्या लाभांश प्राप्तिपोटी महसूल चालू आर्थिक वर्षासाठी लक्षणीयरीत्या कमी करून तो ३४,७१७.२५ कोटी रुपये अंदाजला आहे. त्या संबंधाने मूळ अंदाज ६५,७४६.९६ कोटी रुपये असा होता. प्रत्यक्षात २२ मार्चपर्यंत लाभांशापोटी २०२०-२१ मध्ये जमा महसूल ३०,३६९ कोटी रुपयांचा आहे, असे गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. संरक्षण क्षेत्र, रेल्वे, वीजनिर्मिती आणि पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रात कार्यरत या कंपनीत केंद्र सरकारचे ५४.०३ टक्के भागभांडवल आहे.

Advertisement

केंद्र सरकारसाठी उत्पन्नाचे विविध मार्ग आहेत. त्याद्वारे सरकारकडून महसूल गोळा केला जातो. मागील सहा वर्षांच्या काळात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर ३०० टक्क्यांपेक्षा आधिक कर लावल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सरकारनेच दिली होती. तसेच या पेट्रोलियम पदार्थांवर राज्य सरकारांकडूनही कर आकारला जातो. त्यामुळे या द्वारे राज्य सरकारांना सुद्धा महसूल मिळतो.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply