Take a fresh look at your lifestyle.

म्हणून बंगालमध्ये काँग्रेस गायब; पहा नेमका काय दिसतोय पोलिटिकल प्लॅन..!

कोलकाता :

Advertisement

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. परंतु, सर्वाधिक चर्चा पश्चिम बंगालची आहे. याचे कारणही तसेच आहे. काही वर्षांपूर्वी कुठेच न दिसणारा भाजप आज येथे प्रबळ दावेदार आहे. तसेच काँग्रेस व डावे पक्ष येथे एकत्र निवडणूक लढत आहेत. या राज्यात पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला आहे. शनिवारी पहिल्या टप्प्यातील ३० जागांसाठी मतदान होणार आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह डझनभर केंद्रीय मंत्र्यांनी तसेच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी जोरदार प्रचार केला. मात्र, काँग्रेसच्या प्रचार फारसा दिसला नाही. प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिसल्या नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेसच्या या खेळीमागे भाजपला रोखणं आणि तृणमूल काँग्रेसला फायदा पोहोचवणं हाच हेतू असल्याच्या चर्चा होत आहेत. 

Advertisement

उद्या शनिवारी २७ मार्च रोजी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी ३० जागांवर मतदान होणार आहे. मात्र, प्रचार संपला तरी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बंगालमध्ये फिरकले नाहीत. काँग्रेसने बंगालच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका यांची नावे होती. परंतु, प्रत्यक्षात हे तिन्ही स्टार प्रचारक बंगालमध्ये आलेच नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Advertisement

काँग्रेस बंगालच्या निवडणुकांना महत्त्व देत नाही की यामागे काही खेळी आहे ? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. काँग्रेसच्या या अनपेक्षित खेळीमुळे भाजपची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. तिरंगी लढत झाली असती तर काँग्रेस आणि टीएमसीच्या मतांमध्ये विभागणी झाली असती. त्याचा फायदा भाजपलाच झाला असता, असं भाजपला वाटत होतं. पण काँग्रेसच्या खेळीने भाजपला टेन्शन दिलं आहे.

Advertisement

काँग्रेसने आपले लक्ष आसामवर केंद्रीत केले आहे. आसामच्या निवडणुका संपल्यानंतर गांधी कुटुंबातील नेत बंगालमध्ये प्रचार करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तोपर्यंत येथे तीन टप्प्यातील निवडणुका झालेल्या असतील. याचा फायदा टीएमसीला मिळालेला असेल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply