Take a fresh look at your lifestyle.

माठातील पाणी पिण्याचे हे आहेत फायदे; वाचा आरोग्यदायी महत्वाचे मुद्दे

मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना असलेल्या मातीने बनवलेल्या माठातील नैसर्गिकरित्या थंड पाणी पिणे म्हणजे एक पर्वणी असते. तृष्णा भागविण्याचे महत्वाचे कार्य या पाण्याने खऱ्या अर्थाने पूर्ण होते.  मोठ्या माठाला ‘रांजण’ असेही म्हणतात. माठ घेताना बोट दुमडून वाजवून बघावा लागतो, तो ठणठणीत वाजला की समजावे तो पक्का भाजला आहे. मग तो जास्त पाझरत नाही. 

Advertisement

आज आपण याच मठाचे आणि त्यातून पाणी पिण्याचे फायदे पहाणार आहोत. ते पुढीलप्रमाणे :

Advertisement

मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो. हे पाणी पर्यावरण पूरक आहे.

Advertisement

सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिणे चांगले असते. अशा रुग्णांनी माठातील थंडगार पाणी पिणे घशासाठी चांगले असते.

Advertisement

याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते. उष्माघाताला आळा बसण्यासाठी यामुळे मदत होते.  माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे. 

Advertisement

उन्हाळ्यात शेतात झाडाखाली कोरड्याठाक हवेचा झोत सतत वाहत असतो. अशा हवेत माठ असेल तर माठाबाहेर येणाऱ्या पाण्याच्या थेंबांचे वेगाने बाष्पीभवन होते व त्यामुळे माठातील पाणी अधिक थंड होते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply