Take a fresh look at your lifestyle.

चेहऱ्यावरचे काळे डाग असे करा दूर; वाचा घरगुती स्वस्त-मस्त ट्रिक्स

चेहऱ्यावरचे काळे डाग दूर करण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट करुन हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी साध्या पद्धतीने उपाय करणे शक्य आहे. टोमॅटो, छोले, मध, बटाटे या वस्तू प्रत्येक घरात असतातच. त्यामुळे या वस्तुंच्या मदतीनेही चेहऱ्यावरील काळे डाग दूर करता येणे शक्य आहे. कसे ते आपण जाणून घेऊ या.. 

Advertisement

चेहऱ्यावर काळे डाग अनेक कारणांनी येतात. उन्हात जास्त काळ वावरल्यामुळे चेहरा काळा पडतो. ही समस्या अनेकांना जाणवते. या व्यतिरिक्त जर चेहऱ्यावर मुरम येत असतील तर त्याचेही डाग चेहऱ्यावर राहतात. यामुळे चेहऱ्यावरील तजेलदारपणा कमी होतो. काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटो उपयुक्त ठरते. टोमॅटोमध्ये लायकोपेने हा घटक असतो. हा घटक त्वचा उजळ करण्यास मदत करतो. त्यामुळे टोमॅटोची पेस्ट करुन काळ्या डागांवर लावावी. यामुळे चेहरा मऊ होतो. तसेच चेहऱ्यावरील खड्डे कमी होतात. टोमॅटोचा लेप आठवड्यातून दोन वेळेस तरी लावावा. लेप लावल्यानंतर साधारण १५ ते २० मिनिटांनंतर चेहरा पाण्याने साफ करावा. 

Advertisement

बटाट्यामध्ये त्वचेसाठी उपयुक्त घटक मुबलक प्रमाणात असतात. त्वचा साफ करणारे घटक बटाट्यात असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतात. बटाट्याच्या रसाचा फेस पॅक करताना एक चमचा बटाट्याचा रस, एक चमचा दही किंवा लिंबाचा रस घ्यावा. हा फेस पॅक पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवावा. नंतर पाण्याने चेहरा साफ करावा.

Advertisement

मधही त्वचेसाठी फायदेशीर आहे. हातावर थोडे मध घेऊन चेहऱ्यास काही काळ हलका मसाज करावा. यानंतर पंधरा मिनीटे तसेच राहू द्यावे. त्यानंतर चेहरा पाण्याने साफ करावा, अशा प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चेहऱ्यावरील काळे डाग दूर करता येतील. यातून चेहऱ्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान सुद्धा होणार नाही.

Advertisement

संपादन : मुकुंद शिरसाठ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply