Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : वनअधिकारी चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी उपवनसंरक्षकाला अटक..!

नागपूर :

Advertisement

अमरावतीमधील मेळघाट व्याघ्र प्रकल्पच्या गुगामल वन्यजीव विभाग येथील हरीसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अमरावती पोलिसांनी शुक्रवारी नागपुरातून अटक केली आहे.

Advertisement

चव्हाण यांच्या आत्महत्येने अवघ्या महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. एक कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या आत्महत्येने महाराष्ट्राला चटका लागला आहे. तसेच यानिमित्ताने वन विभागाच्या अंतर्गत कारभारात असलेले राजकारण आणि अधिकाऱ्यांची मनमानी चव्हाट्यावर आली आहे.

Advertisement

दक्षिणेतील कर्नाटक या त्यांच्या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती अमरावतीचे पोलिस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन. यांनी दिली आहे. चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे याप्रकरणी म्हटले जात आहे. दिपाली चव्हाण यांची सुसाईड नोट सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यानुसार पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे.

Advertisement

सुसाईड नोटमध्ये उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनीच त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. यामुळे विनोद शिवकुमार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र रेंजर्स असोसिएशनने केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply