Take a fresh look at your lifestyle.

पंढरपूर निवडणूक अपडेट : परिवर्तनासाठी भाजपने ‘अशी’ केलीय तयारी; प्रशासनानेही ‘असे’ केलेय नियोजन

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी दि. १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी होऊ नये यासाठी प्रथमच ८० वर्षावरील व दिव्यांग व्यक्तींसाठी टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे. ही निवडणूक जिंकून राज्यात आणखी एक आमदार वाढवण्याची तयारी भाजपने केली आहे.

Advertisement

गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चार जणांनी अर्ज नेल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. पीपल्स रिपब्लिक पार्टीचे महेंद्र काशिनाथ जाधव (रा. कासेगाव ता. पंढरपूर) व अपक्ष संदीप जनार्दन खरात (रा. माण ता. खटाव जि. सातारा) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

Advertisement

 पोटनिवडणुकीसाठी परिचारक कुटुंबातील असो की समाधान आवताडे असो यावेळी मतविभागणी न होता भाजपचाच उमेदवार निवडून आला पाहिजे, असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे.

Advertisement

उमेश परिचारक यांनी भाजपकडे पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागितली आहे. समाधान आवताडे किंवा परिचारक कुटुंबातील एकाला उमेदवारी मिळेल, असा वरिष्ठ स्तरावरून निरोप मिळाला आहे. उमेदवारी कोणालाही मिळो सर्वांनी भाजपचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने काम करावे, असे आवाहन परिचारक यांनी केले.

Advertisement

टोपियन शुगर साखर कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपाध्यक्ष विवेक कचरे, भाजप तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, प्रशांत देशमुख, प्रणव परिचारक यांच्यासह पांडुरंग परिवाराचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply