Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊनचाही काउंटडाऊन सुरू; पहा काय अल्टिमेटम दिलाय अजितदादांनी

पुणे :

Advertisement

राज्यभरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असतानाच अनेकजण कोणतीही काळजी न घेता बोंबलत फिरत असल्याने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही पारा चढला आहे. त्यांनी  २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम देताना काळजी घेऊन व्यवहार करण्याचेही आवाहन केले आहे.

Advertisement

पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णावाढ होत आहे. त्यानिमित्ताने पमुख्यमंत्री अजित यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यावेळी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना त्यांनी २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला.

Advertisement

पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या करोनाच्या परिस्थितीवर बोलताना म्हटले की, गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होत असल्याने लॉकडाऊन कारणे टाळले जात आहे. मात्र, लोकांनी नियम न पाळल्यास दुसरा पर्याय नसेल. मागच्या तुलनेत मृत्यूदर कमी झालाय हे खरं आहे. पण परिस्थिती अजूनही गंभीर असल्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

पुण्यातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा २ लाख ४७ हजार ६२९ पर्यंत पोहोचला आहे. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख २६ हजार ९३६ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती गंभीर असतानाच सर्वांनी कशी काळजी घ्यावे याचेही नियम जारी झालेले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply