Take a fresh look at your lifestyle.

पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी ‘हे’ आहेत महत्वाचे मुद्दे; वाचा ही महत्वाची माहिती

औरंगाबाद :

Advertisement

जलसंपदा विभागाच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जलसंपदा विभागाचे मुख्य अपर सचिव विजय कुमार गौतम आणि सचिव घाणेकर आणि मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे आदींनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

Advertisement

सहभागी सिंचन व्यवस्थापन हाच एकमेव मार्ग असल्याचे मत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने नोंदवले आहे. तर, महाराष्ट्रात कार्यक्षम, समन्यायी आणि शाश्वत सिंचन व्यवस्था विकसित करायची असेल तर सभासद शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून पाणी वापर संस्थांची उभारणी आणि त्यांचे सक्षमीकरण करण्याचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आलेला आहे.

Advertisement

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने राज्यभरातील सहभागी सिंचन व्यवस्थेच्या सद्य:स्थितीचा अभ्यास करून तयार केलेल्या अहवालातील मुद्दे असे :

Advertisement
  • मागील दोन वर्षांत एकूण तीन टप्प्यांत केलेल्या या अभ्यासाअंतर्गत राज्यातील एकूण १६३ पाणी वापर संस्था, जलसंपदा विभागाचे १६३ कर्मचारी आणि ४९९८ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण
  • महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थेचे पुनुरुज्जीवन करण्यासाठी एकूण १६ शिफारशी
  • णी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी पाणी वापर संस्थांची व्याप्ती वाढविणे आवश्यक
  • पाणी वापर संस्थांना लाभक्षेत्रातील सर्व प्रकारचे पाण्याच्या स्रोतांचे (कालवा, भूजल, नदी-नाले आणि तलाव) व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम करावे
  • संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सहभागी सिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओंची मदत घ्यावी
  • पाणी वापर संस्थांच्या निर्मिती प्रक्रियेतील अनेक त्रुटींमुळे या संस्थांची सुरुवातच डळमळीत झाली
  • पाणी वापर संस्थांची स्थापना, नोंदणी, जलसंपदा विभागासोबत करार, संयुक्त पाहणी आणि सिंचन यंत्रणांचे हस्तांतरण अशा प्रक्रियांमधील त्रुटी दूर कराव्या लागतील
  •  पाणी वापर संस्थांना प्रशिक्षण देणे आवश्यक

संपादन : महादेव गवळी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply