Take a fresh look at your lifestyle.

निवडणूक : म्हणून पंचायत समितीत गुंड व डॉ. पवार यांना मिळाली संधी

अहमदनगर :

Advertisement

गेल्या काही दिवसांपूर्वी पदाधिकारी सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापति रवी भापकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या निवडीकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागून होते. आज शुक्रवार दि. २६ मार्च ला पदाधिकारी निवड कार्यक्रम पार पडला. सभापतीपदी सुरेखा गुंड यांची तर उपसभापतीपदी निंबळक गणाचे सदस्य डॉ. दिलीप पवार यांची वर्णी लागली. 

Advertisement

गेला पंधरा दिवसांपासून तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. आपल्या मर्जीतला व्यक्तींची वर्णी लावण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली होती. गतवेळी पदाधिकारी निवड करताना नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. त्यावेळी सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापति रवी भापकर यांच्याकडून सव्वा वर्षाच्या कार्यकाळानंतर राजीनाम्याचा पक्का शब्द मिळाल्याने त्यावेळचा मार्ग सुकर झाला होता. ठरल्याप्रमाणे कोकाटे व भापकर यांनीही राजीनामे देऊन शब्द पाळला. नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता सुरेखा गुंड व डॉ. दिलीप पवार यांना संधी देण्याबाबत एकमताने निर्णय घेतला.  त्यानुसार या निवडी आज अंतिम करण्यात आल्या. 

Advertisement

डॉ. दिलीप पवार हे गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्यांनी तालुकाउपप्रमुख पदावर काम केले आहे. सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी डावलण्यात आली होती. त्यांनी पुढील काळातही पक्षाच्या नेत्यांवरील विश्वास ठेवून पक्ष बांधणीचे काम केले. तालुक्यात शिवसेनेची बांधणी केली. २०१७ मध्ये निंबळक गणातून ते विजयी झाले. त्यानंतर दोन वेळा झालेल्या पदाधिकारी निवडीत त्यांना संधी मिळाली नसली तरी यावेळी त्यांची वर्णी लागली आहे. 

Advertisement

तालुक्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरोधात सर्व पक्षीय नेत्यांनी महाविकास आघाडीची मोट बांधली आहे. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे आणि कर्डिलेंचे मिळते जुळते आहे. त्यांच्यासमोर आव्हान देण्यासाठीच डॉ. दिलीप पवार यांनामहाविकास आघाडीने ताकद दिली असल्याची तालुक्यात चर्चा रंगली आहे. साधारणपणे वर्षभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याने त्यादृष्टीने महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी केली आहे. 

Advertisement

सभापतीपद हे महिलेसाठी राखीव असल्याने सुरेखा गुंड यांना यावेळी संधी मिळाली. नव्या चेहऱ्यांना संधी देऊन महाविकास आघाडीने पुढील निवडणुकांची पायाभरणी केली आहे. 

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply