Take a fresh look at your lifestyle.

इस्रायलच्या निवडणुकीमध्ये ‘राम’ असणार किंगमेकर; पहा नेमका काय लागलाय निकाल

तेल अवीव :

Advertisement

इस्रायल देशाच्या निवडणुकीत सत्ताधारी लिकुड व त्यांच्या सहकारी पक्षांना सर्वाधिक ५९ जागा मिळाल्या आहेत. मात्र, त्यांना स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आलेले आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत आता युनायटेड अरब लिस्ट हा पक्ष किंगमेकर बनणार आहे.

Advertisement

युनायटेड अरब लिस्ट यास हिब्रू भाषेत ‘राम’ असे संबोधले जाते. राम पार्टी मुळात अरबी लाेकांचे नेतृत्व करणारी आहे. त्यामुळे आता या देशाच्या सत्तास्थापनेत ही इस्लामिक पार्टी किंगमेकरची भूमिका निभावणार आहे.

Advertisement

बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील लिकुड आघाडीला जनतेने स्पष्ट बहुमत नाही. तर, विराेधी पक्षाला ५६ जागा मिळाल्या आहेत. २० जागांसाठी झालेल्या संसदीय िनवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत असा निकाल लागल्याने आता ज्यांच्यावर ‘राम’ पार्टीची कृपादृष्टी पडेल त्या आघाडीला इथे सत्ता स्थापन करता येणार आहे.

Advertisement

राम पार्टीला किमान ५ जागा मिळाल्याने आता ही पार्टी ज्यांच्या पारड्यात आपले सदस्य देईल त्यांचीच सत्ता येणार आहे. येथील पंतप्रधान नेतन्याहू हे कट्टर धार्मिक राष्ट्रवादी विचारांसाठी आेळखले जातात. पॅलेस्टाइनला जास्त सवलती देणे किंवा गाझा पट्ट्यात इस्रायली वसाहतींचा विस्तार राेखण्याच्या विराेधात आहेत.

Advertisement

तर, ज्यू धार्मिकबहुल असेलल्या इस्रायलमध्ये मुस्लिमांची संख्या खूप कमी आहे. त्यातच या मुस्लिमांत एकजुटीचा अभाव असल्याने ते वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देत आहेत. मात्र, यंदा प्रथमच पॅलेस्टाइन व अरब देशांसाेबत चांगले संबंध ठेवण्याचे समर्थन करणाऱ्या राम पार्टीला पाच जागांएवढी मते मिळाली असल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झालेला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply