Take a fresh look at your lifestyle.

काय तर म्हणे, ‘मी नेणार चंद्रावर..’; पहा कोणी दिलयं हे निवडणूक आश्वासन

दिल्ली :

Advertisement

देशाच्या कानाकोपऱ्यात रोज कुठे ना कुठे निवडणुका सुरू असतातच. निवडणूक एखाद्या लहान ग्रामपंचायतीची असो किंवा देशाच्या लोकसभेची मतदान मिळवण्यासाठी उमेदवार अनेक अफलातून आयडीया वापरतात. जाहीरनाम्यात तर अक्षरशः आश्वासनांची खैरात केली जाते.

Advertisement

निवडणूक काळात अशा अफलातून घोषणा करण्यात तामिळनाडू हे राज्य जरा जास्तच प्रसिद्ध आहे. आताही या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवार मतदारांसाठी अनेक आश्वासने देत आहे. येथील एका उमेदवाराने निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये त्याने चक्क चंद्रावर नेणार असल्याचे म्हटले आहे. आहे की नाही भन्नाट आयडीया..

Advertisement

तामिळनाडूमध्ये सहा एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे अनेक पक्ष व उमेदवार आपले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. या जाहीरनाम्यांमध्ये लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख आहे. मात्र, येथे एका उमेदवाराचा जाहीरनामा जास्तच चर्चेत आहे. या जाहीरनाम्यात उमेदवाराने अगदी आयफोन, हेलिकॉप्टर, एवढेच काय तर चंद्रावर सहल नेण्याचेही आश्वासन दिले आहे. दक्षिण मदुराई मतदारसंघातील उमेदवार सर्वनान या उमेदवाराचा हा जाहीरनामा चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

Advertisement

जाहीरनाम्यातील या गोष्टी खऱ्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. निवडणूक जिंकल्यास मतदारसंघातील प्रत्येक घरात एक आयफोन, वाहन, हेलिकॉप्टर, होडी, रोबोट तर देणारच शिवाय घरातील एका व्यक्तीच्या नावे तीन मजली घर बांधून देणार असल्याचा दावा सर्वनानने केला आहे. दक्षिण मदुराईमध्ये दोन लाख ३० हजार मतदार आहेत. जर ५० तरुण निवडणुकीला उभे राहिले आणि प्रत्येकाने ५० मतं जरी मिळवली तरी कोणत्याच पक्षाला विजय मिळवता येणार नाही, हे लोकांना घाबरतील. मी याचसंदर्भात जागृती करण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply