Take a fresh look at your lifestyle.

मस्तच… इपीएफओने सुरू केली ‘ही’ सुविधा; पहा काय होणार आहते फायदे

मुंबई :

Advertisement

सरकारी काम असेल तर एकाच वेळेत होईल याची खात्री केव्हाही देता येत नाही. सरकारी कामांमध्ये वेळेचा अपव्यय ही एक फार मोठी समस्या आहे. आजच्या ऑनलाइनच्या युगात कामकाज ऑनलाइन पद्धतीने होत आहे. सरकारी कामकाजातही या पद्धतीचा वापर वाढला आहे. केंद्र सरकारने तर ऑनलाइन पद्धतीनेच कामकाज करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे कामकाजास वेग आला आहे. नागरिकांचाही त्रास कमी होत आहे. किरकोळ कामांसाठी कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज राहिली नाही.

Advertisement

सेवानिवृत्तीनंतर कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतनाशी संबंधित माहितीसाठी कार्यालयांमध्ये जावे लागते. ही समस्या संपवण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओने आपल्या पोर्टलवर निवृत्तीवेतनासाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. जिथे पेन्शनधारकांना पेन्शनशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

Advertisement

निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी पीएफ कार्यालयात एक जीवित प्रमाणपत्र सादर करावे लागते. ज्यामुळे अनेकजण कार्यालयात चक्कर मारताना दिसतात. परंतु, आता जीवन प्रमाणपत्र संबंधित प्रत्येक माहिती पोर्टलवरच उपलब्ध होईल.

Advertisement

पीपीओ क्रमांकाच्या सहाय्याने निवृत्तीनंतर निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन मिळते. हा १२ आकडी रेफरेंस नंबर असतो. निवृत्तीवेतनाच्या पासबुकमध्ये पीपीओ क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. पेन्शन खाते बँकेच्या एका शाखेतून दुसर्‍या शाखेत हस्तांतरित करण्यासाठी पीपीओ क्रमांक आवश्यक आहे. आता कर्मचार्‍यांना पोर्टलवरून ही माहिती मिळू शकेल.

Advertisement

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, पीएफ क्रमांक किंवा नोंदणीकृत बँक खाते क्रमांक सादर करावा लागेल. त्यानंतर पीपीओ क्रमांक दिसेल. त्यामुळे या कामांसाठी आता कार्यालयात जाण्याची काहीही गरज नाही. ऑनलाइन पद्धतीने हे कामकाज करता येणार आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply