Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘या’ एकाच सामन्यात ९९ धावांवर ३ फलंदाज झाले होते बाद..!

मुंबई :

Advertisement

इंग्लंड आणि पाकिस्तानी संघात झालेल्या एका सामन्यात फलंदाजांच्या बाबतीत घडलेला हा एक अनोखा किस्सा आहे. एका सामन्यात ९९  धावांत ३  फलंदाज बाद झाले होते. फलंदाजाला शतक पूर्ण करण्यास १ धाव कमी पडणे ही खूप दुर्देवी बाब आहे. अशावेळी फलंदाजाची काय अवस्था होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. तर हा अनोखा विक्रम असलेला सामना १९७३  मध्ये खेळला गेला होता.

Advertisement

कराची येथे १९७३  मध्ये  २४  ते २९  मार्च दरम्यान हा सामना खेळला गेला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली,  त्यानंतर ६  विकेट गमावल्यानंतर ४४५  धावांवर पहिला डाव घोषित केला. सलामीवीर सादिक मोहम्मद ८९  धावांवर बाद झाला आणि ११ धावांनी त्याचे शतक हुकले. तिसऱ्या क्रमांकावर  कर्णधार माजिद खान आणि चौथ्या क्रमांकावर मुश्ताक मोहम्मद फलंदाजीला आले होते. माजीद खान ९९  धावांवर बाद झाला. माजिद खाननंतर मुश्ताक मोहम्मदही ९९ धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला.

Advertisement

९९  धावा करुन बाद होण्याची ही कहाणी इथेच थांबली नाही. इंग्लंडने पहिल्या डावात ३८६  धावा केल्या. त्यात डेनिस अमीसही माजिद व मुश्ताक सारखाच ९९ धावांवर बाद होवून पॅव्हिलियनमध्ये  परतला. अशाप्रकारे सामन्यात तीन फलंदाज ९९  धावांवर बाद झाले.  इंग्लंडला २५९  धावांचे लक्ष्य मिळाले. दुसर्‍या डावात पाकिस्तानने केवळ १९९ धावा केल्या. विकेटकीपर फलंदाज वसीम बारीने संघासाठी सर्वाधिक ४१  धावा केल्या.

Advertisement

त्याच्याशिवाय तलत अलीने ३९, आसिफ इक्बालने ३६  आणि सरफराज नवाजने नाबाद ३३  धावा केल्या. इंग्लंडकडून नॉर्मन गिफर्ड आणि जॅक बिरकशा यांनी पाच फलंदाजांची शिकार केली. अशा प्रकारे इंग्लंडला विजयासाठी २५९ धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंडच्या संघाने १ विकेट गमवत ३०  धावा केल्या आणि सामना अनिर्णयीत घोषित करण्यात आला.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply