Take a fresh look at your lifestyle.

बापरे, फ़क़्त दोन दिवसात ७ लाख कोटी पाण्यात; पहा कोणाचे झालेय नुकसान

मुंबई :

Advertisement

देशभरात झपाट्याने वाढत जाणाऱ्या करोना व्हायरसच्या धास्तीमुळे शेअर बाजारात (bse / nse share market India) घसरण सुरू आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या दोन दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

Advertisement

देशातील करोनाबाधितांच्या संख्या वाढत असल्याबद्दलची चिंता गुरुवारीही भांडवली बाजारात उमटली. परिणामी टाळेबंदी विस्तारण्याबाबतची धास्तीही गुंतवणूकदारांमध्ये दिसली. गुरुवारी भांडवली बाजारात समभाग विक्रीचा दबाव राहिला. मुंबई शेअर बाजारातील सर्व १९ क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले. त्यातही दूरसंचार, ऊर्जा, वाहन, बहुपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता अधिक, ३ टक्क्यांपर्यंत खाली आले. मिड कॅप व स्मॉल कॅप २.२२ टक्क्यांपर्यंत घसरले. 

Advertisement

देशात करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यात रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे निर्बंध आधिक कठोर करण्यात येत आहेत. पुन्हा लॉकडाऊन होते की काय याबाबतही चर्चा सुरू आहे. सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी मात्र ही धोक्याची घंटा ठरेल. या भीतीने शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. येथे विक्रीचा सपाटा लावण्यात आला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply