Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून धोनी आणि कोहलीपेक्षा अधिक श्रीमंत आहे ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू..!

पुणे :

Advertisement

भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाच्या माध्यमातून जगात आपली ओळख निर्माण केली आहे. भारतीय क्रिकेटपटूही संपत्तीच्या बाबतीत काही कमी नाहीत. त्यांच्या खेळामुळे लोकप्रिय असलेले अनेक क्रिकेटपटू जाहिरातींमधूनही पैसे कमवतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केल्याबरोबरच खेळाडूंचे नशीब आर्थिकदृष्ट्या फळफळते. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी आपल्या संपत्तीबाबत चर्चेत असतात. हे दोघे एका वर्षात कोट्यवधी रुपये कमवतात. पण असा एक क्रिकेटर आहे जो त्यांच्याइतका प्रसिद्ध नाही,  पण तरीही तो संपत्तीच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहे.

Advertisement

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की या क्रिकेटपटूकडे ना खेळाचा अनुभव आहे ना तो मोठी स्पर्धा खेळला आहे. आपण बोलत आहोत ते प्रसिध्द उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमान बिर्लाबद्दल. आर्यमान २०१८ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलकडून खेळताना दिसला. आर्यमानच्या कुटूंबाचा आदित्य बिर्ला ग्रुप आहे. आर्यमानचे वडील कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे सुमारे ७० हजार कोटींची संपत्ती आहे. आर्यमानकडेही स्वतःची प्रचंड संपत्ती आहे.

Advertisement

आर्यमानला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि आपला छंद पूर्ण करण्यासाठी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अगदी लहान वयातच क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊन त्याने बारकावे शिकले. आर्यमन रणजी करंडक स्पर्धेत मध्य प्रदेश संघाचा देखील एक भाग होता. सध्या आर्यमान वैयक्तिक समस्येमुळे क्रिकेटपासून दूर आहे. असे सांगितले जात आहे की आरोग्याच्या कारणास्तव आर्यमानने क्रिकेटपासून अंतर ठेवले आहे. सध्या तो त्याच्या आरोग्याकडे लक्ष देण्यात पूर्ण वेळ देत आहे.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply