Take a fresh look at your lifestyle.

बदलत्या हवामानात सर्दी-खोकल्याने परेशान असल्यास वाचा ‘हे’ खास रामबाण उपाय

आता हवामानात कोणते बदल कधी होतील हे सांगताच येत नाही. अशा पद्धतीने हवामानाच्या बदलास शरीर तयार नसल्याने मग आजार येतात. अशावेळी अनेकदा आपल्याला व्हायरल पद्धतीचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. यात प्रमुख्याने आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप येण्याच्या जास्त तक्रारी असतात. सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक होतो. यातही कोरडा खोकला अधिक त्रासदायक असतो. यावर योग्य वेळेत यावर उपचार केले तर तुम्हाला आराम मिळेल. पण जर दुर्लक्ष झाले तर प्रकृती गंभीरही होय शकते.

Advertisement

खोकल्याचा त्रास कमी प्रमाणात असला तरीही त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही घरगुती आणि नैसर्गिक उपचारांची मदतही घेऊ शकता. सर्दी, खोकला होणे ही छोटी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका. याच निष्काळजीपणामुळे गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

Advertisement

यासाठीचे घरगुती उपाय आणि पदार्थ असे :

Advertisement

आले आणि मीठ : खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. पूर्वीपासून याचा वापर केला जात आहे. आल्याचा छोटा तुकडा बारीक करून घ्या आणि यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेउन त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्यावा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा.

Advertisement

ज्येष्ठमध : ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. हा चहा दिवसातून दोनदा तरी घ्या

Advertisement

मध : कोरड्या खोकल्यावर मधाचे सेवन करणे हा रामबाण उपाय मानले जाते. मधामुळे घशातील खवखव कमी होते. तसंच घशामधील संसर्गही दूर होतो. कोरडा खोकला कमी करण्यासाठी छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या. नियमित हा उपाय केल्यास कोरड्या खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळेल.

Advertisement

हळद : एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित घ्या. तुमचा कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होईल. हळदीमध्ये कर्रक्युमिन नावाचे घटक असते. या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित काही आजारांचा त्रास कमी होईल.

Advertisement

गुळ : सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हाही प्रभावी उपाय आहे. गुळातील पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते. सर्दी खोकल्याव्यतिरिक्त गुळामुळे पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. कोमट पाण्यामध्ये गूळ पावडर मिक्स करा आणि प्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाण आणि दिवसातून किती वेळा हा उपाय करावा, याबाबत सल्ला घ्यावा.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply