Take a fresh look at your lifestyle.

रेशनकार्डच्या निमित्ताने मोदी सरकारची जनविरोधी मोहीम; पहा कोणी केलीय अशी टीका

अहमदनगर :

Advertisement

शिधापत्रिका धारकांकडून रेशन दुकानदार एक हमीपत्र भरून घेत असून हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची जनविरोधी मोहीम असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत यांनी केला आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की,  जर राज्य व केंद्र सरकारने हे जनविरोधी मोहिमेचे हमीपत्र लिहून घेणे थांबवले नाही, तर आंदोलन पुकारले जाईल. यासाठी आज (२६ मार्च, २०२१) पहिल्या टप्प्यात प्रत्येक रेशनिंग दुकानावर जाऊन या हमीपत्राची दुकानासमोर होळी केली जाईल.

Advertisement

मात्र, या कृतीची दखल घेऊन जनविरोधी मोहिमेचे हमीपत्र लिहून घेणे थांबवले नाही तर दुसऱ्या टप्प्यात २ एप्रिल रोजी राज्यातील प्रत्येक तहसीलदार कचेरीवर हजारो लोकांच्या उपस्थितीत आंदोलन केले जाईल. त्याची जबाबदारी शासनावर असेल, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

Advertisement

आरएसएसने मोदींच्या माध्यमातून मूलनिवासी भारतीयांचा सामूहिक नडणयाचे ठरवले आहे हे स्पष्ट होत आहे, असा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे. बहुजन मुक्ती पार्टी शहराध्यक्ष सुभाष बोराडे, दादा शिंदे, कालिदास सावंत, भाऊसाहेब फुलमाळी, बापू काकडे, भारत शिंदे, लक्ष्मण सावंत, शेटीबा पवार, सुनील काकडे यांनीही सरकारच्या या जनविरोधी मोहिमेवर टीका केली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, हमीपत्रात असे सांगितले आहे की, जर माझ्या किंवा माझ्या शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस असेल, तर माझी शिधापत्रिका रद्द केली जाईल. भारतात जे लोक दारिद्र्यरेषेखाली रहात आहेत. त्यांना या शिधापत्रिकेमुळे स्वस्त दरात धान्य भेटते. या हमीपत्राच्या माध्यमातून सरकारने दारिद्र्य रेषेखालील लोकांची शिधापत्रिका रद्द करण्याचे धोरण आखले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply