Take a fresh look at your lifestyle.

रश्मी शुक्ला यांनी भाजपच्या पाठींब्यासाठी आणला होता ‘त्या’ मंत्र्यांवरही दबाव..!

मुंबई :

Advertisement

सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेऊन खासगी व्यक्तींचे फोन टॅप केल्याच्या प्रकरणाने पोलिसांच्या आणखी एका वेगळ्याच कामाची जगजाहीर वाच्यता झाली आहे. आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांचे हे प्रकरण त्यामुळे चर्चेत आहे. त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी भाजपच्या पाठींब्यासाठी शुक्ला यांनी दबाव आणल्याचा दावा केला आहे.

Advertisement

शिरोळ विधानसभा (जि. कोल्हापूर) मतदारसंघात अपक्ष म्हणून विजय मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी शुक्ला यांनी आपल्यावर तीन ते चार वेळा मोठा दबाव आणला होता, असा दावा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केला आहे.

Advertisement

‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून प्रथमच विजय प्राप्त केल्यानंतर तातडीने त्या वेळी रश्मी शुक्ला यांच्या वतीने आपणाशी संपर्क साधला गेला आणि आपण भाजपला पाठिंबा द्यावा, असा दबाव निर्माण केला गेला, असा दावा मंत्री यड्रावकर यांनी केल्याने आता खळबळ उडाली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की,  वेळी रश्मी शुक्ला यांनी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी आपण संपर्क करून देण्याचे आश्वासनही दिले होते. प्रमुख कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी संपर्क साधून याबाबत निर्णय देण्याचे मी म्हटले होते. नंतर आपण तातडीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर आपण तातडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना जाहीर पाठिंबाही देऊन टाकला.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply