मुंबई :
कोणताही आरोपी पकडल्यावर त्यांच्याकडून अनेक धक्कादायक माहिती आणि मुद्द्यांचा महापूर सुरू होतो. तसाच प्रकार आता अँटिलिया स्फोटके प्रकरणातील संशयित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्या बाबतीतही घडत आहे. दररोज यामध्ये वेगवेगळे ट्विस्ट येत असल्याने याप्रकरणी पुढे कोण अडकणार, याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, वाझे याच्या घरातून ६२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात अाली आहेत. विशेष म्हणजे पोलिस खात्याने त्याला केवळ ३० काडतुसे जारी केली होती. त्यापैकी फक्त ५ सापडली आहेत. याचाच अर्थ जास्तीचे काडतूस हे वेगळ्या कामासाठी खास वेगळ्या पद्धतीने मिळवले असल्याचे दिसते. एनआयएचे वकील अतिरिक्त साॅलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी गुरुवारी विशेष एनआयए न्यायालयात ही माहिती दिली आहे.
तसेच वाझे याने न्यायालयात गंभीर आरोप केला आहे की, अँटिलिया प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, मला बळीचा बकरा बनवले जात आहे. अँटिलिया आणि हिरेन मृत्यूचे प्रकरण याच्याशी संंबंधित आणखी दोन जणांना अटक करण्यात आली अाहे. तसेच वाझे यास 10 दिवसांची म्हणजे ३ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
नव्याने पकडलेल्या दोघांची वाझेसोबत आमनेसामने चाैकशी करण्याची गरज असल्याचे एनआयएने म्हटले आहे. त्यानुसार वाझेची कोठडी १५ दिवस वाढवण्याची मागणी अनिलसिंग यांनी केल्यावर न्यायालयाने केवळ १० दिवसांची कोठडी दिली आहे.
दरम्यान वाझे याने न्यायालयात म्हटले आहे की, स्फोटके सापडल्यानंतर तपास अधिकारी होतो. त्यावेळी दीड दिवसात माझ्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले गेले. परंतु, कुठेतरी अचानक वेगळी सूत्रे हलली. या घटनांमागे असलेली पार्श्वभूमी मला न्यायालयात लिखित स्वरूपात सांगायची आहे. १३ मार्च रोजी एनआयए कार्यालयात जाताच मला अटक करण्यात झाली आणि मग लगेचच मी गुन्हा कबूल केला असे बोलले जात आहे. परंतु, ते चुकीचे असून मी गुन्हा कबूल केलेला नाही.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.
- अहमदनगर सर्वेक्षण : ‘झेडपी’बाबत नागरिकांचे आहे ‘हे’ मत; पंचायत समितीबाबत म्हटले जातेय ‘असे’..!
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे
- अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!
- म्हणून सिटी बँकेने घेतला बोरिया बिस्तर आवरण्याचा निर्णय; ग्राहक-नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम
- रोहित पवार ब्लॉग : याबाबत निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा…; पहा काय आवाहन केलेय त्यांनी