Take a fresh look at your lifestyle.

भारताकडून पदार्पण करणारे ‘हे’ खेळाडू गाजवताय मैदान; रचलेत असेही भन्नाट विक्रम..!

मुंबई :

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु असून ३ सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिला सामना ६६ धावांनी जिंकला आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी २६ मार्च रोजी खेळवला जाणार असून भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, इंग्लंडविरुध्दच्या टेस्ट आणि टी २० मालिकेत भारताने विजय संपादन केला असून वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ आता सज्ज आहे. या दौऱ्यात अनेक भारतीय खेळाडूंनी कसोटी, टी २० आणि वनडेत पदार्पण करत मैदान गाजवलं आहे. इतकंच नव्हे तर नवीन विक्रमही प्रस्थापित केले आहेत.

Advertisement

आतापर्यत या मालिकेत तीन ते चार खेळाडूंनी पदार्पण केले असून त्यांनी पदार्पण केलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ धमाकेदार कामगिरी केली एवढेच नाही एक नवीन विक्रम रचले आहेत. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध प्रथम संधी देण्यात आली. पदार्पण मालिकेत कोणत्याही भारतीय गोलंदाजाने आतापर्यंत केली गेलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी त्याने केली असून तीन कसोटी सामन्यात त्याने २७ बळी घेतले आहेत. तत्पूर्वी, भारताकडून डावखुरा फिरकीपटू दिलीप दोशीने १९७९ मध्ये ६ कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकूण २७ बळी घेतले होते. इतकेच नव्हे तर पदार्पण कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अक्षर पटेलने श्रीलंकेच्या अजिंठा मेंडिसला मागे टाकले आहे.

Advertisement

या मालिकेत टी २० फॉर्मेटमध्ये ईशान किशनने. पाच सामन्यांच्या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात किशनला पदार्पणाची संधी मिळाली. त्याने पहिल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत २२ चेंडूत ५६ धावा कुटल्या. पदार्पणाच्या सामन्यात भारतासाठी वेगवान अर्धशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. सूर्यकुमार यादवने कोणताही नवीन विक्रम रचला नाही पण पहिल्या डावात ज्या शैलीत त्याने फलंदाजी केली त्याची सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे पहिल्याच चेंडूवर त्याने जोफ्रा आर्चरला षटकार ठोकला तर या सामन्यात अर्धशतकीय खेळी केली.

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना २३ मार्च रोजी खेळला गेला. यामध्ये क्रुणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा या दोन खेळाडूंनी पदार्पण करत विक्रमी कामगिरी केली. पंड्याने त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक झळकावत नवीन विश्वविक्रम केला. पदार्पण सामन्यात जगातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा मान त्याला मिळाला. त्याने २६ चेंडूत अर्धशतक झळकावले.

Advertisement

डेब्यू सामन्यात वेगवान गोलंदाज कृष्णाने ५४ धावा देवून ४ बळी घेतले. एकदिवसीय सामन्यात भारताच्या कोणत्याही गोलंदाजाची ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वी हा विक्रम नोएल डेव्हिडच्या नावे होता. त्याने २१ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या होत्या. डेव्हिड व्यतिरिक्त भारताकडे आतापर्यंत एकदिवसीय डेब्यू सामन्यात ३ बळी घेणारे १६ गोलंदाज आहेत.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी 

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply