Take a fresh look at your lifestyle.

तर गॅसची टाकीही 1 हजारांना होऊ शकेल; पहा नेमके काय म्हटलेय काँग्रेस नेते काळे यांनी

अहमदनगर :

Advertisement

 शंभर दिवस उलटून गेले. सुमारे तीनशेहून अधिक शेतकऱ्यांचा उपोषणा दरम्यान दिल्ली सीमेवर मृत्यू झाला. पेट्रोल-डिझेलच्या किमती शंभरीला जाऊन पोहोचल्या. भविष्यात गॅसची किंमत देखील हजारापर्यंत पोहोचल्यास आश्चर्य वाटू नये. मात्र केंद्रातील भाजप सरकार यावर कोणतीही ठोस पावले उचलायला तयार नाही ही देशवासीयांसाठी अत्यंत खेदाची बाब आहे, अशी टीका शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

Advertisement

शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. मनोज गुंदेचा, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष अज्जू शेख, महिला सेवादल अध्यक्ष कौसर खान, इंटक जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, अनंतराव गारदे, खालील सय्यद, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, निजाम जहागीरदार, गणेश आपरे, शंकर आव्हाड, नलिनी गायकवाड, जरीना पठाण, उषा भगत, सुमन कलापहाड, शबाना शेख, मंगल साठे, लता वाघमारे, भिंगार काँग्रेसचे कॅ. रिजवान शेख, सागर दळवी आदि यावेळी उपस्थित होते.

Advertisement

र्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. तसेच केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच काळे म्हणाले की, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहरात केंद्राच्या विरोधात लढा अधिक तीव्र करण्याची भूमिका भविष्यात घेतली जाईल.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply