Take a fresh look at your lifestyle.

म्हणून माठ विक्री करणाऱ्यांवर कोसळले संकट; पहा नेमका कसा झालाय दुष्परिणाम

अहमदनगर :

Advertisement

दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच गार पाण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढते. यामुळे माठ विक्री व्यावसायिकांना यंदाच्या वर्षी तरी काहिसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामुळे माठ खरेदी करण्यास कोणीही येत नसल्याने गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षी मार्च संपत आला असला तरी माठ विकले न गेल्याने कुंभार समाजाचे मोठे अर्थिक नुकसान झाले.

Advertisement

मागच्या वर्षी उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. इतर व्यवसायांप्रमाणे कुंभार व्यवसायही अडचणीत आला. यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला माठ विक्री सुरू झाली असतानाच लोक फ्रिजचे पाणी पिण्याऐवजी माठातील पाण्याला अधिक पसंती देताना दिसून येत हाेते. परंतु पुन्हा कोरोनाचा आलेख वाढतच चालल्याने ग्राहक घराच्या बाहेर पडत नसल्याने कुंभार व्यवसाय अडचणीत येतो की काय? अशी अवस्था निर्माण झाली. माठ बनवण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या दरामध्ये यंदा वाढ झाली. भुशाच्या किमतीही वाढ झाली असल्याने यंदा एका माठाचा किमतीत २० ते ३० रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याचे माठ व्यावसायिकांनी सांगितले. सध्या मोठ्या प्रमाणात नळ असलेल्या माठांना ग्राहक पसंती देत आहेत.

Advertisement

पुन्हा कोरोनाने उन्हाळाच्या प्रारंभी डोकेवर काढले. पुन्हा लॉकडाऊन झाला, तर व्यवसाय होईल की नाही? याची चिंता सतवत आहे. मागच्या वर्षी उन्हाळ्यात माती आणि भुसा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठ बनवले. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. यामुळे सर्वच जण घरात बसून असल्याने माठाकडे पाठ फिरवली. याचा फटका पारंपरिक कुंभार व्यावसायिकांनाही बसला. यंदा तरी मागील वर्षी केलेला खर्च निघेल आणि दोन पैसे मिळतील, हीच अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहे.

Advertisement

व्यवसाय अडचणीत येतो की काय? अशी अवस्था निर्माण झाली. माठ बनवण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या दरामध्ये यंदा वाढ झाली. भुशाच्या किमतीही वाढ झाली असल्याने यंदा एका माठाचा किमतीत २० ते ३० रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याचे माठ व्यावसायिकांनी सांगितले. सध्या मोठ्या प्रमाणात नळ असलेल्या माठांना ग्राहक पसंती देत आहेत. पुन्हा कोरोनाने उन्हाळाच्या प्रारंभी डोकेवर काढले.

Advertisement

पुन्हा लॉकडाऊन झाला, तर व्यवसाय होईल की नाही? याची चिंता सतवत आहे. मागच्या वर्षी उन्हाळ्यात माती आणि भुसा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठ बनवले. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. यामुळे सर्वच जण घरात बसून असल्याने माठाकडे पाठ फिरवली. याचा फटका पारंपरिक कुंभार व्यावसायिकांनाही बसला. यंदा तरी मागील वर्षी केलेला खर्च निघेल आणि दोन पैसे मिळतील, हीच अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply