Take a fresh look at your lifestyle.

म्हणून MH पासिंगच्या गाड्यांना गुजरातबंदी; मात्र, काहींनी काढली नवीच शक्कल..!

नाशिक :

Advertisement

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी गुजरात राज्याने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र पासिंग असलेल्या किंवा इकडून तिकडे जाणाऱ्या गाड्यांना बंदी घातली आहे. तिकडे जाण्यासाठी करोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आलेला आहे.

Advertisement

गुजरातच्या आरोग्य विभागाने आदेशात म्हटले आहे की, कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट असल्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांना गुजरातमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. गुजरात सरकारने बुधवारी काढलेल्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे आता असे रिपोर्ट नसणाऱ्या सर्व व्यक्ती आणि त्यांच्या गाड्या पाठीमागे फिरवल्या जात आहेत.

Advertisement

यासाठी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलिस दलाचे पथक तैनात आहेत. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांची तपासणी सुरू करण्याचे आदेश  असल्याने त्यानुसार कार्यवाही सुरू झालेली आहे.

Advertisement

गुजरात ची आरोग्य पथक 24 तास सीमावर्ती भागात वाहन चालकाची थर्मल स्कॅनिंग, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचा तपास करीत आहे. त्यामुळे अनेक गाड्या मागे फिरवल्या गेल्या आहेत. तोंडाला मास्क नसल्यास गुजरात पोलीस एक हजार रूपयांचा दंड महामार्गावर वसूल करीत आहे. महाराष्ट्र पासिंग फोर व्हीलर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

Advertisement

जळगाव व धुळे जिल्ह्यातील अनेक वाहनचालकांचे कुठलेही कारण ऐकून न घेता परतीच्या प्रवासाला मार्गस्थ व्हावे लागले आहे. त्याचवेळी काहींनी यासाठी नवी शक्कल काढली आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील वाहनचालकांनी नवापुरात महाराष्ट्र पासिंग MH 39 नंदुरबार, MH18 धुळे, MH19 जळगाव अन्य जिल्ह्यातील गाड्या बदलून ते आता गुजरात पासिंगच्या गाड्या भाड्याने घेत असल्याची बातमी दिव्य मराठी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply