Take a fresh look at your lifestyle.

corona news : राज्यात ‘हा’ भाग ठरतोय करोना हॉटस्पॉट..!


मुंबई :

Advertisement

मागील वर्षात करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या राजधानी मुंबईतील धारावीतील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मात्र, या शहरात आता दुसरा हॉटस्पॉट तयार होत आहे. शहरातील अंधेरी पश्चिम भागात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत.

Advertisement

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनानं शिरकाव केल्यानंतर वरळीनंतर धारावी करोनाचा हॉटस्पोट ठरला होता. करोना संसर्ग रोखण्यासाठी पालिकेनं धारावी पॅटर्न राबवला होता. पालिकेच्या या पॅटर्नमुळं धारावीतील रुग्णसंख्या अटोक्यात आली होती. मात्र, यंदाच्या फेब्रुवारीत करोनानं पुन्हा उचल खालली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांच ५ हजार नवीन रुग्ण सापडले आहेत. मात्र, यावेळी झोपडपट्टी व चाळीव्यतिरिक्त उच्चभ्रू वस्तीत करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर येत आहे.  बुधवारी ५ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, पालिकेनं काल मुंबईतील ६० इमारती सील केल्या आहेत. त्यामुळं सध्या मुंबईत एकूण ४३२ इमारती सील आहेत.

Advertisement

राज्यातील अन्य शहरात सुद्धा स्थिती गंभीर होत आहे. देशात सर्वाधिक करोना प्रकरणे असणाऱ्या दहा जिल्ह्यांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये तब्बल नऊ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचेही टेन्शन वाढले आहे. मोठ्या शहरांप्रमाणेच लहान शहरे आणि ग्रामीण भागातही करोना फैलावत आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवणे सुरू केले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच करोना प्रतिबंधक लसीकरणास वेग देण्यात येत आहे. राज्यातील करोनाच्या परिस्थितीवर केंद्र सरकारचे देखील लक्ष आहे. देशात करोनाचे वाढणारे रुग्ण पाहता केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.  

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply