Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा ‘त्या’ पाकिस्तानी खेळाडूने सचिनला म्हटले होते ‘मुलगा माझा आहे पण फॅन तुझा..!’

मुंबई :

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणजे भारत विरुध्द पाकिस्तान. दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी येत असून २०२१ मध्ये या दोन देशांमध्ये क्रिकेट मालिका होऊ शकेल, असा दावा पाकिस्तानी माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या मालिकेच्या चर्चेने एकूणच भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट प्रेमाबद्दल सोशल मिडीयात भरभरुन लिहलं जात आहे.

Advertisement

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील खास बात म्हणजे त्यांचे फॅन्स. या दोन्ही देशाच्या चाहत्यांना जगभर वेडं म्हणूनच ओळखलं जातं. अर्थात याचा चाहत्यांना काही फरक पडत नाही, पण सांगण्याचा मुद्दा हाच की दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी हे आपल्या देशातील खेळाडूंचे चाहते आहेत. अगदी ते देवासारखे खेळाडूंना पुजतात, मानतात. यातील मजेशीर किस्सा सोशल मिडीयात चांगलाच व्हायरल झाला आहे.

Advertisement

सचिनने एकदा मुलाखतीत एक रंजक घटना सांगितली होती. ही कहाणी पाकिस्तानचे तत्कालीन कर्णधार इंझमाम-उल-हक आणि त्यांच्या मुलाशी संबंधित आहे. सचिन म्हणाला, ‘एकदा आम्ही पाकिस्तान दौऱ्यावर होतो तेव्हा आमची नेट प्रॅक्टिस लाहोरमध्ये सुरू होणार होती. मग इंझमाम त्याच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आला. तो म्हणाला की हा माझा मुलगा आहे पण तो क्रिकेटमध्ये तुझा चाहता आहे. त्यानंतर सचिनने इंझमामच्या मुलाबरोबर थोडा वेळ घालवला.

Advertisement

सचिन तेंडुलकर आणि इंझमाम-उल-हक हे समकालीन क्रिकेटपटू होते. सचिनने १९८९ मध्ये पाकिस्तानमध्ये क्रिकेट कारकीर्द सुरू केली. इंझमामने १९९१ मध्ये पहिला सामना खेळला होता. जगातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. पाकिस्तानकडून इंझमाम-उल-हकने सर्वाधिक धावा केल्या आहेत. ९० च्या दशकात या दोन खेळाडूंची बऱ्याचदा तुलना केली जात असे. पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान सचिनपेक्षा इंझमामला एक चांगला क्रिकेटपटू म्हणून वर्णन करायचे.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी 

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply