Take a fresh look at your lifestyle.

अगं बाबो.. फक्त तीन दिवसांत २३०० कोटींची विक्री; पहा कुणी केली ही कामगिरी

मुंबई :

Advertisement

जगात आघाडीवरील स्मार्टफोन कंपनी असणाऱ्या ओप्पो या कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतात लेटेस्ट ओप्पो एफ १९ सिरीज लाँच केली होती. या नव्या सीरिजमध्ये कंपनीने ‘ओप्पो एफ १९ प्रो प्लस’ आणि ‘ओप्पो एफ १९ प्रो’ हे दोन स्मार्टफोन आणले असून दोन्ही स्मार्टफोनला भारतीयांचा जबरदस्त प्रतिसाद मिळालाय.

Advertisement

लाँचिंगनंतर पहिल्या सेलच्या सुरूवातीच्या तीन दिवसांमध्येच कंपनीने भारतात एफ १९ सीरिजच्या तब्बल २३०० कोटी रुपयांच्या फोन्सची विक्री केली आहे. भारतीय ग्राहकांनी या फोनला प्रचंड प्रतिसाद दिल्याने हे शक्य झाले आहे. ओप्पोकडून बुधवारी याबाबत माहिती देण्यात आली.

Advertisement

सेलच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या विक्रीने यापूर्वीच्या सर्व ओप्पो फोनच्या विक्रीचा विक्रम मोडल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं. ओप्पो एफ १९ सीरिजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप, सुपर एमोलेड डिस्प्ले, फिंगरप्रिंट सेन्सर यांसारखे फिचर्स आहेत. शिवाय, प्रो प्लस व्हेरिअंटमध्ये ५ जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट, तर प्रो मॉडेल ४ जी व्हेरिअंटमध्ये आहे.

Advertisement

ओप्पो एफ १९ प्रो प्लसच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत २५ हजार ९९० रुपये आहे. तर, एफ १९ प्रो च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत २१ हजार ४९० रुपये आहे व टॉप व्हेरिअंट ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजची किंमत 23 हजार 490 रुपये आहे. फ्लुइड ब्लॅक आणि स्पेस सिल्वर अशा दोन पर्यायांमध्ये हे दोन्ही स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या फोनमध्ये अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत या फोनची जबरदस्त क्रेझ पहायला मिळत आहे.

Advertisement

स्मार्टफोनसाठी भारत हा एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांचे या बाजारपेठेवर कायमच लक्ष असते. भारतात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे स्मार्टफोन विकले जातात. यामध्ये सॅमसंग, ओप्पो, व्हीवो, अॅपल या कंपन्यांच्या मोबाइलना जास्त मागणी असते. 

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव   

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply