Take a fresh look at your lifestyle.

होळी विशेष : सावधान.. रासायनिक रंग ठरू शकतात ‘इतके’ धोकादायक..!

होळीच्या सणात रंगांची उधळण तर होतेच. रंगपंचमी, धुळवडीत तर सगळीकडे रंगच रंग दिसतात. होळीच्या निमित्ताने रंग आनंद पसरवण्याचे काम केले जाते. मात्र, जर या रंगांमध्ये भेसळ असेल तर रंगाचा बेरंग होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे रंगपंचमीसाठी रंगांचा वापर करताना सावधानता बाळगलीच पाहिजे. रासायनिक रंगांचा वापर कोणत्याही परिस्थितीत टाळायलाच हवा. कारण या रंगांमध्ये अनेक प्रकारची रसायने टाकून रंग तयार केले जातात. त्यामुळे असे रंग मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही घातकच ठरतात.  

Advertisement

आपण आपल्या त्वचेचे रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी चांदीच्या रंगाचा वापर करतो, त्या चांदीच्या रंगात कार्सिनोजेनिक असते, यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, जर या रंगांमुळे त्वचेमध्ये एलर्जीची समस्या उद्भवली असेल, किंवा जर ते डोळ्यांत गेले तर आपल्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. चला तर, जाणून घेऊया अशा रासायनिक कृत्रिम रंगांनी होणारे नुकसान आणि त्यापासून बचावण्याचे मार्ग…

Advertisement

 जेव्हा हे रंग आपल्या त्वचेवर लावले जातात, तेव्हा यामुळे खाज सुटणे, लालसरपणा, पुरळ, पुळ्या अशा समस्या अनेकांना जाणवतात. अशी उदाहरणे घडलीही आहेत. परंतु, जर हे रंग डोळ्यांत गेले तर ते इतके धोकादायक असू शकते, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. हे रंग डोळ्यांना धोकादायक ठरू शकतात.   

Advertisement

सिल्वर आणि लाल रंगात कार्सिनोजेनिक घटक आढळतात. अशा परिस्थितीत त्वचेवर हे रंग लावल्यानंतर, सूर्यप्रकाशाच्या तीव्र प्रकाशामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्वचेला रंगांच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी त्वचेवर नारळ तेल किंवा मोहरीचे तेल चांगल्या प्रकारे लावा. ते वापरल्याने रंग थेट आपल्या त्वचेवर लागणार नाही. परंतु, रंग आपल्या त्वचेवर लागला तरीही आपण त्वरित पाण्याने स्वच्छ करा. रासायनिक रंगांचे असे धोके आहेत, याऐवजी आपण नैसर्गिक रंगांना प्राधान्य दिले पाहिजे. हे रंग घरच्या घरी सुद्धा तयार करतात.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply