Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘त्या’ पद्धतीने झाली मनसुख हिरेन यांची हत्या; त्यावेळी वाझे होता ‘तिकडे’..!

मुंबई :

Advertisement

द्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेली कार ज्या मालकाची होती त्यांचे नाव होते मनसुख हिरेन. या घटनेनंतर हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. त्याच हिरेन यांच्या हत्येबाबतचा तपशील समोर आलेला आहे.

Advertisement

प्रकरणाचा तपास महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांची टीम करीत आहे. अटकेत असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यासह याप्रकरणी आणखी चौघांचा समावेश असल्याचे एटीएसने म्हटले आहे.

Advertisement

ठाणे सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ला दिलेल्या रिपोर्टमध्ये याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. त्यात असे म्हटलेले आहे की, मनसुखची हत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करण्यात आले होते. त्यानंतर श्वास रोखून धरून ही हत्या करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी सचिन वाझे सुद्धा उपस्थित असल्याचे अहवालात म्हटलेले आहे.

Advertisement

मनसुखच्या चेहऱ्यावर बांधलेल्या 5 रुमालांमध्ये क्लोरोफॉर्म टाकण्यात आले होते. श्वास रोखून मारल्यानंतरही आरोपींना मनसुखच्या मृत्यूबाबत शंका होती. त्यामुळे, त्यांनी रुमाल बांधून मनसुखला पाण्यात फेकून दिले. विशेष म्हणजे, प्राथमिक तपासातच अधिकाऱ्यांना मनसुखच्या चेहऱ्यावर बांधलेल्या रुमालवरून हत्येचा संशय आला होता, असे सूत्रांनी म्हटलेले आहे.

Advertisement

एटीएसने घटना घडली त्यावेळी मोबाईल लोकेशन सुद्धा तपासून यासंदर्भात सबळ पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे आता वाझे आणि या प्रकरणात असलेल्या सर्वांचा पर्दाफाश करण्यात तापसी अधिकाऱ्यांना यश येत असल्याचे चित्र आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply