Take a fresh look at your lifestyle.

हे दोन खेळाडू आहेत टी २० विश्वचषक संघात स्थान मिळविण्यासाठीचे दावेदार

मुंबई :

Advertisement

भारतीय संघाचा माजी स्टाईलीश फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी दोन खेळाडूंची संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदारी असल्याचे सांगितले आहे. यामध्ये आक्रमक फलंदाज सुर्यकुमार यादव व ईशान किशनचा समावेश आहे.

Advertisement

सूर्यकुमार आणि ईशानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार पदार्पण केले आहे. या वर्षाच्या अखेरीस टी २० वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. या विश्वचषकात ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना भारतीय संघात स्थान मिळावे, असा मत लक्ष्मण यांनी व्यक्त केले आहे. २२ वर्षीय ईशान आणि ३० वर्षीय सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली असून इशानने इंग्लंडविरुद्ध ३२ चेंडूत ५६ धावा केल्या, तर सूर्यकुमारने चौथ्या आणि पाचव्या टी २० सामन्यात अनुक्रमे ३१ चेंडूंत ५७ आणि १७ चेंडूत ३२ धावा केल्या आहेत.

Advertisement

लक्ष्मण म्हणाला की, हा एक अतिशय कठीण पेचप्रसंग आहे, कारण या मालिकेत अनेक तरुण खेळाडूंनी दमदार कामगिरी करत संधीचा पूर्ण फायदा घेतल्याचे आपण पाहिले आहे. पण ईशान आणि सूर्यकुमार पहिल्या डावात ज्या पद्धतीने खेळले त्यानूसार हे दोघे विश्वचषक संघात असावेत असे मला वाटते. ते पुढे म्हणाले की, ही निवड सोपी नाही, परंतु गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. तर भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले की, टी २० विश्वचषकास अजून बराच वेळ आहे आणि बरेच खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळवू शकतात.

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply